Mahesh Bhagwat : मराठमोळ्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी; महेश भागवत हैदराबादचे पोलीस आयुक्त
Mahesh Bhagwat : महाराष्ट्राच्या मातीतील अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी देशभरात आपल्या कामाचा ठसा उमटवत असतानाच, आता आणखी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.

Mahesh Bhagwat : महाराष्ट्राच्या मातीतील अनेक अधिकारी देशसेवेत आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवत असून, त्यापैकीच एक नाव म्हणजे आयपीएस महेश भागवत. मूळ अहिल्यानगरच्या पाथर्डीचे असलेल्या महेश भागवत यांची हैदराबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. (Mahesh Bhagwat)
तेलंगणा सरकारने 21 आयपीएस अधिकाऱ्यांची खांदेपालट केली असून व्ही.सी. सज्जनार यांच्याजागी महेश भागवत यांची हैदराबाद पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यामुळे, भागवत यांचे महाराष्ट्रासह देशभरातून अभिनंदन होत आहे. (Mahesh Bhagwat)
हैदराबादचे पोलीस आयुक्त असलेल्या व्ही.सी. सज्जनार यांनी फायर अँड डिजास्टर रिस्पॉन्सच्या महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली असून, स्पेशल प्रोटेक्शन फोर्सच्या प्रमुखपदाचाही अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. (Mahesh Bhagwat)
तर, हैदराबाद पोलीस आयुक्तपदी महेश भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. 13 नोव्हेंबर रोजी बंजारा हिल्स येथील कार्यालयात भागवत यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे, ते हैदराबादचे 63 वे पोलीस आयुक्त ठरले आहेत. (Mahesh Bhagwat)
त्यामुळे, निश्चितच महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. भागवत यांनी पदभार स्वीकारताच त्यांचे अभिनंदन होत असून, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनीही फेसबुकवर त्यांचे अभिनंदन केले आहे. (Mahesh Bhagwat)





