‘जरा हटके जरा बचके’ ओटीटीवर येण्यास सज्ज; कुठे आणि कधी पाहता येणार?

Zara Haatke Zara Bachke OTT Release| अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे दोघे ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकले होते. २०२३ मध्ये जूनमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या हा सिनेमा तुम्हाला पाहणे शक्य होणार आहे.
लक्ष्मण उटेकर दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून येत्या १७ मे जिओ सिनेमावर हा चित्रपट पाहता येणार आहे. जिओ सिनेमाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर विक्की कौशलला टॅग करत चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. “सहकुटुंब लग्न केलं होतं, आता सहकुटुंब घटस्फोटही होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी घटस्फोटासाठी नक्की या” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिला आहे. Zara Haatke Zara Bachke OTT Release|
View this post on Instagram
दरम्यान, हा चित्रपट २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यापूर्वी हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार होता, परंतु या चित्रपटाला जिओ सिनेमावर स्ट्रीम करण्याची तारीख मिळू शकली नसल्याने ओटीटीवर चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अवघ्या ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११५.८९ कोटींची कमाई केली होती. Zara Haatke Zara Bachke OTT Release|
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५.४९ कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ७.२० कोटी केली होती. सारा अली खान आणि विक्की कौशल या चित्रपटाद्वारे दोघे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आहेत. चित्रपटात या दोन स्टार्सशिवाय नीरज सूद, राकेश बेदी आणि शरीब हाश्मी सहाय्यक भूमिकेत आहेत.





