IPL 2026 Schedule : मोठी बातमी! बीसीसीआयकडून आयपीएल २०२६ चं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दोन संघात रंगणार पहिला सामना
IPL 2026 Schedule : बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

IPL 2026 Schedule Announce for Phase 1 : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात २८ मार्च ते १२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या सामन्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हंगामाचा सलामीचा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे.
निवडणुकांमुळे वेळापत्रकात दोन टप्पे –
यंदा देशातील चार राज्यांमध्ये (केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम) विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा एप्रिलमध्ये जाहीर होणार असल्याने बीसीसीआयने सध्या केवळ १५ दिवसांचे वेळापत्रक दिले आहे. निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक समोर आल्यानंतर उर्वरित आयपीएल सामन्यांची घोषणा केली जाईल.
कधी आणि कुठे होणार तुमच्या लाडक्या टीमचे सामने?
- मुंबई इंडियन्स: मुंबईचा पहिला सामना २९ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध घरच्या मैदानावर (वानखेडे स्टेडियम) होईल.
- चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाडचा संघ ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटीमध्ये आपला पहिला सामना खेळेल.
- गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स: ३१ मार्चला मुल्लांपूर येथे हा सामना रंगेल.
- लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स: १ एप्रिल रोजी लखनऊमध्ये या दोन संघांमध्ये लढत होईल.
१५ दिवसांत २८ सामने आणि १० शहरे –
🚨 IPL 2026 SCHEDULE IS OUT. 🚨
– The first phase IPL schedule is now out. (Express Sports). pic.twitter.com/K29G6kF6d7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 11, 2026
पहिल्या १५ दिवसांत आयपीएलचे सामने १० वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. यात सर्वाधिक ३-३ सामने कोलकाता आणि गुवाहाटी येथे होतील, तर उर्वरित शहरांमध्ये प्रत्येकी २ सामने खेळवले जातील. तसेच ४ आणि ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांना ‘डबल हेडर’ (एकाच दिवशी दोन सामने) चा आनंद घेता येईल.





