Hardik Pandya : नताशा की माहिका? पंड्या ब्रदर्समध्ये ‘या’ कारणावरून ठिणगी; विश्वविजेतेपदानंतर क्रुणालच्या कृतीने चाहत्यांना धक्का
Hardik Pandya : या विजयानंतर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, परंतु यावेळी कारण त्याचे क्रिकेट नसून त्याच्या कुटुंबातील अंतर्गत वाद हे आहे.

Hardik Pandya Krunal Pandya Rift 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, परंतु यावेळी कारण त्याचे क्रिकेट नसून त्याच्या कुटुंबातील अंतर्गत वाद हे आहे. संपूर्ण देश टीम इंडियाचे अभिनंदन करत असताना, हार्दिकचा सख्खा मोठा भाऊ क्रुणाल पंड्या याने सोशल मीडियावर साधी अभिनंदनाची पोस्टही न केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विजयाच्या जल्लोषात क्रुणाल-पंखुरी गायब –
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये हार्दिकची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा उपस्थित होती आणि ती अनेकदा हार्दिकसोबत दिसली. मात्र, ज्या क्रुणालने हार्दिकच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात साथ दिली, तो आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मा संपूर्ण स्पर्धेत कुठेही दिसले नाहीत. क्रुणालने विजयानंतर मौन बाळगल्यामुळे या दोन्ही भावांमधील नाते आता संपुष्टात आले आहे का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
#WATCH : Hardik Pandya’s girlfriend Mahieka Sharma steals spotlight at T20 World Cup 2026#MahiekaSharma #HardikPandya #TeamIndia #WorldCupChampions #T20WorldCup #INDvsNZ #T20WC2026 #WorldChampions #IndiaWins #WorldCupWinner #IndiaVsNewZealand #INDvNZ pic.twitter.com/0mtipQMSD7
— upuknews (@upuknews1) March 8, 2026
नताशासोबतच्या घटस्फोटावरून वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाल्यापासून दोन्ही भावांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. नताशापासून वेगळे झाल्यानंतरही क्रुणाल आणि पंखुरी यांनी नताशा व अगस्त्य (हार्दिकचा मुलगा) यांच्याशी जवळचे संबंध ठेवले आहेत. अनेकदा त्यांना नताशासोबत वेळ घालवताना पाहिले गेले आहे, जे कदाचित हार्दिकला आवडलेले नाही. याच कौटुंबिक कारणामुळे पंड्या ब्रदर्समध्ये फूट पडल्याचे बोलले जात आहे.
आयपीएलमधील वाटा वेगळा –
एकेकाळी मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळून संघाला तीनवेळा चॅम्पियन बनवणाऱ्या या जोडीचे आता मार्गही वेगळे झाले आहेत. हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे, तर क्रुणाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच आता त्यांच्या वैयक्तिक नात्यातही मोठी दरी निर्माण झाल्याचे विश्वचषकाच्या फायनलमधील अनुपस्थितीवरून स्पष्ट होत आहे.





