RR vs GT : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये आज हाय-व्होल्टेज ड्रामा; प्लेऑफच्या शर्यतीत कोण मारणार बाजी?
RR vs GT : या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत आहेत. पहिल्या लढतीत राजस्थानने गुजरातचा ६ धावांनी पराभव केला होता.

RR vs GT Head to Head Stats : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चा हंगाम आता अशा वळणावर आला आहे, जिथे प्रत्येक सामन्यागणिक प्लेऑफचे समीकरण बदलत आहे. आज (शनिवारी) स्पर्धेतील ५२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन तगडे संघ समोरासमोर येणार आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
बदला घेण्यासाठी गुजरात सज्ज –
या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत आहेत. पहिल्या लढतीत राजस्थानने गुजरातचा ६ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात शुबमन गिलचा संघ केवळ पराभवाचा बदला घेण्यासाठीच नाही, तर अंकतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
जयपुर के SMS स्टेडियम में RR vs GT मुकाबले से पहले जोरदार तैयारी
वैभव सूर्यवंशी ने नेट्स में लगाए लंबे शॉट्स
गेंदबाजों ने लाइन-लेंथ पर किया फोकस
पॉइंट्स टेबल में RR चौथे और GT पांचवें स्थान पर
प्लेऑफ की रेस के लिए मुकाबला बेहद अहमआपके हिसाब से आज कौन भारी पड़ेगा?#RRvsGT… pic.twitter.com/z0VL6iZJ4H
— Sambrat Chaturvedi | Rajasthan (@samjpr) May 8, 2026
दोन्ही संघांची आतापर्यंतची स्थिती –
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत १० सामने खेळले असून ६ विजय आणि ४ पराभवांसह १२ गुण मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही १० सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांची कमाई केली आहे, परंतु रनरेटमुळे ते पाचव्या क्रमांकावर आहेत. आजचा विजय दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
INDIAN PREMIER LEAGUE 2026
52ND MATCH
RAJASTHAN ROYALS VS GUJARAT TITANSGET 100% GUARANTEED MATCH REPORTS#predict88 #matchreport #matchprediction pic.twitter.com/fZjKCXDdKG
— Predict88 (@Predict88cricke) May 8, 2026
हेड-टू-हेड रेकॉर्डचा विचार केला तर गुजरात टायटन्सचे पारडे जड वाटते. उभय संघांत आतापर्यंत ९ सामने झाले असून गुजरातने ६ तर राजस्थानने केवळ ३ सामने जिंकले आहेत. जयपूरच्या मैदानावरही गुजरातने ३ पैकी २ सामन्यांत बाजी मारली आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सच पारडे जड वाटतं असलं, तरी राजस्थानचा सध्याचा फॉर्म पाहता ते वर्चस्व गाजवतील असं दिसतंय.
वैभव सूर्यवंशी विरुद्ध शुबमन गिल –
“Shubman Gill” arriving in Jaipur for RR vs GT Match 💥✨#ShubmanGill #GujaratTitans #RajasthanRoyals #RRvsGT #IPL pic.twitter.com/qBs7HFG2BG
— SpotLight Mediaz (@SpotLightMediaz) May 7, 2026
आजच्या सामन्यात राजस्थानचा १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि गुजरातचा कर्णधार शुबमन गिल यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासारखी असेल. वैभवने या हंगामात ४०० हून अधिक धावा कुटल्या असून तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे गिलनेही आपल्या फलंदाजीने सातत्य राखले आहे. या दोन फलंदाजांची कामगिरीच आजच्या सामन्याचा निकाल ठरवू शकते.





