IPL 2026 Playoffs : गुजरातची अव्वल स्थानी झेप, हैदराबादला मोठा धक्का; जाणून घ्या कोणाला आहे प्लेऑफ्सची संधी आणि काय आहे समीकरण!
IPL 2026 Playoffs : सध्याच्या गुणतालिकेनुसार गुजरात, आरसीबी, हैदराबाद आणि १३ गुणांसह चौथ्या स्थानी असलेला पंजाब किंग्स हे प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत

IPL 2026 Playoffs Scenarios Update : आयपीएल २०२६ च्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने गुणतालिकेत १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून प्लेऑफमधील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव अवघ्या ८६ धावांत आटोपला, ज्यामुळे त्यांच्या नेट रनरेटलाही मोठा फटका बसला आहे.
गुजरात ठरला १६ गुणांचा टप्पा गाठणारा पहिला संघ – (IPL 2026 Playoffs)
गुजरात टायटन्सने या विजयाद्वारे १६ गुणांचा आकडा गाठला असून, यंदाच्या हंगामात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला आहे. गुजरातचे अजून दोन सामने शिल्लक असून, ते जिंकल्यास त्यांना अव्वल २ मध्ये स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे, हैदराबादचा पराभव झाल्याने ते १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरले आहेत, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.
असे आहे प्लेऑफ्सचे गणित – (IPL 2026 Playoffs)
Prediction Time ✍️
Which four teams are you backing to make the cut? 🤔#TATAIPL | #KhelBindaas pic.twitter.com/o22S4o9tjW
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026
सध्याच्या गुणतालिकेनुसार गुजरात, आरसीबी, हैदराबाद आणि १३ गुणांसह चौथ्या स्थानी असलेला पंजाब किंग्स हे प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स वगळता इतर सर्व संघ अजूनही शर्यतीत आहेत.
- सनरायझर्स हैदराबाद: प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान १ विजय आवश्यक आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: ११ पैकी ७ सामने जिंकलेल्या आरसीबीला पुढच्या ३ पैकी फक्त १ सामना जिंकायचा आहे.
- पंजाब किंग्स, चेन्नई आणि राजस्थान: या तिन्ही संघांना प्लेऑफ गाठण्यासाठी आपल्या उर्वरित ३ सामन्यांपैकी प्रत्येकी २ सामने जिंकणे अनिवार्य आहे.





