Riyan Parag Vaping : रियान परागच्या व्हेपिंग प्रकरणावर बीसीसीआयची मोठी प्रतिक्रिया, पंजाब पोलिसांच्या हस्तक्षेपाबाबत खुलासा
Riyan Parag Vaping : भारतात ई-सिगारेटवरील बंदी पाहता, या प्रकरणात पोलिसांच्या हस्तक्षेपाची मागणीही जोर धरू लागली असताना, बीसीसीआयने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

BCCI Secretary Devjit Saikia on Riyan Parag Vaping : राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार रियान परागला ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडले आहे. या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्याला २५ टक्के मॅच फीचा दंड आणि १ डिमेरिट पॉईंटचा सामना करावा लागला आहे. भारतात ई-सिगारेटवरील बंदी पाहता, या प्रकरणात पोलिसांच्या हस्तक्षेपाची मागणीही जोर धरू लागली होती. मात्र, आता बीसीसीआयने (BCCI) यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
पंजाब पोलिसांकडून कोणताही संपर्क नाही –
भारतीय महिला टी-२० विश्वचषक संघाच्या निवडीनंतर बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांना रियान परागच्या व्हेपिंग प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट निषेध अधिनियम २०१९’ अंतर्गत यावर कारवाई होणार का, असे विचारले असता सैकिया यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणी पंजाब पोलिसांनी बीसीसीआयशी कोणताही संपर्क साधलेला नाही. सध्या अशी कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नाही.
🚨 BCCI SECRETARY DEVJIT SAIKIA ISSUES FINAL WARNING TO IPL FRANCHISE 🚨
The BCCI is getting tough on discipline for IPL 2026. Board Secretary Devjit Saikia confirmed that strict action will be taken against team violating regulations, following recent controversias involving… pic.twitter.com/fO1fIwGHHJ
— LUCK7773 (@Luck_7773) May 2, 2026
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संघांवर कडक कारवाईचे संकेत –
केवळ रियान परागच नव्हे, तर राजस्थान रॉयल्सचे संघ व्यवस्थापक रोमी भिंडर यांनी डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे संघाला वादाला सामोरे जावे लागले. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सचिव सैकिया यांनी कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आयपीएलची प्रतिष्ठा आणि शिस्त अबाधित ठेवण्यासाठी खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी मर्यादेत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
बीसीसीआय आता नियम तोडणाऱ्या खेळाडू आणि फ्रँचायझींवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहे. तसेच आयपीएलच्या नियमावलीत अधिक कडक तरतुदी करण्याबाबत विचार सुरू आहे, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा घालता येईल.





