Ramakrishna Ghosh Debut : मराठमोळ्या रामकृष्ण घोषचे IPL मध्ये दमदार पदार्पण! पहिल्याच सामन्यात सूर्याला दाखवला तंबूचा रस्ता
Ramakrishna Ghosh Debut : गोलंदाजी करण्यापूर्वी रामकृष्णने विल जॅक्सचा एक शानदार झेल टिपून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले होते. त्याने डीप बॅकवर्ड पॉइंटवर पुढे धावत घेतलेली डाइव्ह संपूर्ण सामन्याचे आकर्षण ठरली

Ramakrishna Ghosh Makes Dream Debut : आयपीएल २०२६ च्या ४४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियंस (MI) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत चेन्नईच्या ताफ्यातून एक रोमांचक बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या २८ वर्षीय वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh) याला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांची मने जिंकली.
सूर्यकुमार यादव ठरला पहिली विकेट –
चेन्नईने प्रथम गोलंदाजी करताना नवव्या षटकात रामकृष्ण घोषच्या हातात चेंडू सोपवला. आपल्या पहिल्याच षटकात त्याने ७ धावा देत नियंत्रित मारा केला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्याच्यावर विश्वास दाखवत पुढील षटकही दिले आणि घोषने संघाला निराश केले नाही. अकराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्याने मारलेला कट शॉट थेट डीप बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या हातात गेला. सूर्याने १२ चेंडूंत २१ धावा केल्या.
Ramakrishna Ghosh claims his maiden IPL wicket 🔥
He dismisses Suryakumar Yadav for 21 off 12 balls ❌ — a big moment in the game.
MI: 99/3 (10.4)#Cricket #CSKvMI #IPL2026 pic.twitter.com/tXuqnFNl1i
— Mr.Cricket (@karimbuxb20) May 2, 2026
गोलंदाजीपूर्वी फील्डिंगमध्ये कमाल –
Imagine playing your first IPL match and already surpassing the legacy of Shivam Dube, the fielder, who has been playing for the last 6-7 years. 🤡🔥
Ramakrishna Ghosh pulls off one of the catches of the season. 💀👌🏻pic.twitter.com/BNd1lO8C1X
— AdityaVarma (@AdityaVarma45_) May 2, 2026
गोलंदाजी करण्यापूर्वी रामकृष्णने विल जॅक्सचा एक शानदार झेल टिपून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले होते. त्याने डीप बॅकवर्ड पॉइंटवर पुढे धावत घेतलेली डाइव्ह संपूर्ण सामन्याचे आकर्षण ठरली.
कोण आहे रामकृष्ण घोष?
रामकृष्ण घोष हा मूळचा महाराष्ट्राचा खेळाडू आहे. गेल्या मोसमात सीएसकेने त्याला ५० लाख रुपयांना विकत घेतले होते, परंतु एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. महाराष्ट्र संघाकडून खेळताना विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध ४२ धावांत ७ विकेट्स घेत त्याने खळबळ उडवली होती. १३ प्रथम श्रेणी सामन्यांत २८ विकेट्स, ११ लिस्ट-ए सामन्यांत २१ विकेट्स आणि ९ टी-२० सामन्यांत २ विकेट्स अशी त्याची आकडेवारी आहे. आयपीएलमध्ये मिळालेल्या या संधीचे त्याने उत्तम सोने केले आहे.





