RCB vs RR : कॅपने चेंडू उचलला, तरी आरसीबीला दंड नाही; काय आहे कारण? जाणून घ्या नियम

RCB vs RR Suyash Sharma ball handle with cap in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळलेला सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यादरम्यान घडलेली एक घटना चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिली. खरंतर, या सामन्यादरम्यान, आरसीबीचा क्षेत्ररक्षक सुयश शर्माने त्याच्या कॅपने चेंडू उचलला. नियमांनुसार, सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना, खेळाडू चेंडू उचलण्यासाठी त्यांचे कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तूचा वापर करू शकत नाहीत. असे केल्याने, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जातो. पण आरसीबीवर का आकारला नाही दंड? यामागील कारण जाणून घेऊया.
नियम काय सांगतो?
गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या नवव्या षटकानंतर सुयश शर्माने त्याच्या कॅपने चेंडू उचलला. आयपीएल सामना खेळण्याच्या अटींच्या नियम २८.२.१२ नुसार, जर एखाद्या खेळाडूने त्याच्या सामन्यादरम्यान कोणत्याही कापडाने चेंडू पकडला किंवा उचलला तर ते बेकायदेशीर ठरते. यानंतर चेंडू ताबडतोब डेथ घोषित केला जातो आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांची दंड केला जातो.
आरसीबीला पाच धावांचा दंड का आकारला नाही?
Suyash Sharma almost cost 𝗥𝗖𝗕 𝗙𝗜𝗩𝗘-𝗣𝗘𝗡𝗔𝗟𝗧𝗬 𝗿𝘂𝗻𝘀, he picked up the ball using his cap, but got away with it as the ball was declared dead.#IPL2025 #RCBvsRR | 📸 : JioHotstar pic.twitter.com/qj3YUtg3DD
— OneCricket (@OneCricketApp) April 24, 2025
जेव्हा सुयशने कॅपने चेंडू उचलला तेव्हा तो थर्ड मॅनवर फिल्डिंग करत होता. त्याने एक ओव्हर थ्रोचा चेंडू अडवताना असे केले. यानंतर खेळ काही काळ थांबला होता. यावेळी टीव्ही अंपायरने १०वे षटक सुरू होण्यापूर्वी रिप्ले तपासला. ज्यामध्ये असे दिसले की सुयशने कॅपच्या सहाय्याने चेंडू उचलण्यापूर्वीच मैदानावरील दोन्ही पंचांनी चेंडू डेथ घोषित केल्याचे आढळले. यामुळे आरसीबी संघ पाच धावांच्या पेनल्टीपासून थोडक्यात वाचला.
हेही वाचा – IPL 2025 : गावस्कर-चंपक जोडीने गाजवलं मैदान, VIDEO होतोय व्हायरल
आरसीबीने घरच्या मैदानावर नोंदवला पहिला विजय –
सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबीने अखेर आयपीएल २०२५ मध्ये घरच्या मैदानावर आपला पहिला विजय नोंदवला. या मैदानावर गेल्या सलग ३ सामन्यात पराभव पत्करणाऱ्या रजत पाटीदारच्या संघाने रोमांचक सामन्यात जोरदार पुनरागमन करत राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव केला. या विजयात विराट-पडिक्कलसह जोश हेझलवूडने महत्त्वाची भूमिका बजावली. आरसीबीने कोहली आणि पडिक्कल यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ ९ बाद १९४ धावाच करु शकला. ज्यामुळे त्यांना सलग पाचवा सामना गमवावा लागला.





