SRH vs RR Travis Head : ट्रॅव्हिस हेडने केली जोफ्रा आर्चरची तुफान धुलाई! १०५ मीटरच्या षटकारासह एकाच षटकात पाडला धावांचा पाऊस

SRH vs RR Travis Head hit 105 Meter Six to Jofra Archer : आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ज्याची भीती होती तेच घडले. हैदराबादच्या सलामी जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी राजस्थानच्या गोलंदाजांना झोडपण्यास सुरुवात केली. मात्र, राजस्थानने चौथ्या षटकात अभिषेकला बाद केले. यानंतर ट्रॅव्हिस हेडने जोफ्रा आर्चरली धुलाई करताना १०५ मीटरचा उत्तुंग षटकार मारला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ट्रॅव्हिस हेडने जोफ्रा आर्चरची केली धुलाई –
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील ५ वे षटक जोफ्रा आर्चर टाकण्यासाठी आला. ट्रॅव्हिस हेड समोर होता आणि त्याने आर्चरची चांगलीच धुलाई केली. आर्चरच्या या षटकात हेडने एकूण ५ बाऊंड्री मारल्या. षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेडने चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर १०५ मीटरचा उत्तुंग षटकार मिड-विकेटच्या दिशेने मारला. यानंतर, हेडने या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारले. अशाप्रकारे, आर्चरच्या या षटकात हेडने एकूण २३ धावा केल्या.
Hurricane Head graces #TATAIPL 2025 🤩
Travis Head smashing it to all parts of the park in Hyderabad 💪👊
Updates ▶️ https://t.co/ltVZAvInEG#SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/cxr6iNdR3S
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
काव्या मारनचा आनंद होता पाहण्यासारखा –
ट्रॅव्हिस हेडची फलंदाजी पाहून सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनला तिचा आनंद आवरता आला नाही. काव्या स्टँडमध्ये बसली होती आणि हेडचा वादळ पाहून तीही आनंदाने जोरात उड्या मारू लागली. हेडची फलंदाजी पाहून काव्याने जोरात टाळ्या वाजवल्या. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात काव्या मारन तिच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी अनेकदा मैदानावर दिसते.
हेही वाचा – KKR vs RCB : मैदानात जाऊन विराटला भेटणं चाहत्याला पडलं महागात! खावी लागली जेलची हवा
ट्रॅव्हिस हेडला तुषार देशपांडेने केले आऊट –
वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने राजस्थान रॉयल्सला मोठे यश मिळवून दिले आहे. तुषारने स्फोटक फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बाद केले. हेडने २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो सतत आक्रमक फलंदाजी करत होता. ३१ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ६७ धावा काढल्यानंतर हेड बाद झाला. हेडने प्रथम अभिषेक शर्मासोबत ४५ धावांची भागीदारी केली, त्यानंतर इशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. १२ षटकांच्या अखेरीस, हैदराबादने १० षटकांत २ गडी गमावून १३५ धावा केल्या.





