IPL 2025 : टीम इंडियानंतर आता राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सला बनवणार चॅम्पियन…?

IPL 2025 & Rahul Dravid :- राहुल द्रविडची राजस्थान रॉयल्सचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविड केवळ आयपीएलमध्ये या संघाकडून खेळला नाही तर त्याने मेंटर म्हणूनही काम केले आहे. नुकत्याच झालेल्या 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. तो आता आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) फ्रँचायझी साठी काम करताना करताना दिसणार आहे.
राहुल द्रविडशिवाय राजस्थान रॉयल्स संघाला कुमार संगकाराचीही साथ मिळेल. 2022 पासून राजस्थान संघाशी संबंधित असलेला संगकारा आगामी हंगामात आरआर फ्रँचायझीचा क्रिकेट संचालक असेल. दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या जोडीने राजस्थान संघाचे नशीब बदलेल की नाही हे येणारा काळच सांगेल.
Rahul Dravid, India’s legendary World Cup-winning coach, is set for a sensational return to Rajasthan Royals! 🇮🇳🤝
The cricket icon was captured receiving his Pink jersey from the Royals Sports Group CEO Jake Lush McCrum. It is believed that the RR Admin was present too,… pic.twitter.com/C6Q8KRDFgW
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 6, 2024
राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची पुष्टी केली आहे. तसेच यासह एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये द्रविड राजस्थान संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्यानं ‘हल्ला बोल’ असे देखील म्हटले आहे.
Watch it till the end because yes, this is happening! 🔥💗 pic.twitter.com/yh5Ozz395E
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 6, 2024
दहा वर्षांनंतर संघात होणार पुनरागमन…
राहुल द्रविड 2011-2013 दरम्यान राजस्थान रॉयल्सकडून खेळाडू म्हणून खेळला. त्याने आपल्या खेळण्याच्या कारकिर्दीत राजस्थानसाठी (RR) साठी 46 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 29.67 च्या सरासरीने 1,276 धावा केल्या. या काळात त्याने 7 अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या. 2013 मध्ये त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीलाही अलविदा म्हटले, पण पुढच्या वर्षी म्हणजे 2014 मध्ये तो राजस्थान संघाचा मार्गदर्शक होता. म्हणजेच द्रविड 10 वर्षांनंतर आयपीएलमध्ये राजस्थान (RR) संघात परतणार आहे.
राहुल द्रविडने आयपीएल 2014 नंतर राजस्थान रॉयल्स सोडले आणि काही वर्षांनी तो दिल्ली कॅपिटल्स/डेअरडेव्हिल्सचा मार्गदर्शकही बनला. एक खेळाडू म्हणून त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने 89 सामन्यांमध्ये 2,174 धावा केल्या, ज्यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.





