BCCI Awards : ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने संजू नाही तर ‘या’ खेळाडूचा होणार सन्मान; राहुल द्रविडचाही खास पुरस्काराने होणार गौरव
BCCI Awards : कर्णधार शुबमन गिलला 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार दिला जाणार आहे. गिलने गेल्या वर्षात वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती.

BCCI Awards : बीसीसीआयकडून दरवर्षी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नमन पुरस्कार दिला जातो. भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार दिला जाणार आहे. गिलने गेल्या वर्षात वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती.
तर भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारे आणि भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राहुल द्रविड यांचा कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.BCCI Awards
याशिवाय भारतीय संघाला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार आयुष म्हात्रेचा लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तसेच भारताची माजी कर्णधार मिताली राजला देखील जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Vishwapreneur 2026 : उद्योजकतेला नवे पंख देणारा भव्य सोहळा – ‘विश्वाप्रेन्योर २०२६’
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार हा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला जाणार आहे. दिल्लीत १५ मार्चला बीसीसीआयकडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.
राहुल द्रविड यांचा कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान BCCI Awards
अनेक दिग्गज फलंदाजांच्या उपस्थितीतही द्रविड यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांना त्यांच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानले जाते.
राहुल द्रविड यांनी एकदिवसीय (ODI) स्वरूपात १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या आणि कसोटी क्रिकेटमध्येही ते अत्यंत प्रभावी ठरले होते. त्यांनी भारतात तसेच परदेशातील मैदानांवरही धावांचा पाऊस पाडला होता.
राहुल द्रविड यांनी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. भारतीय संघाला अंडर- १९ वर्ल्डकप जिंकून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
हेही वाचा:







