IPL 2025 KKR vs RCB Virat Kohli and Shah Rukh Khan’s dance video viral : आयपीएलचा १८ वा हंगाम शनिवारी केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने सुरु झाला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून केकेआर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानुसार केकेआरने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर १७४ धावांचा डोंगर उभारत आरसीबीला १७५ धावांचे लक्ष्य दिले. तत्त्पूर्वी या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्यातील विराट-शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विराट-शाहरुखच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल –
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उद्घाटन सोहळा पार पडला. कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये अभिनेत्री दिशा पटानी, गायिका श्रेया घोषाल आणि करण औजला यांनी त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने व्यासपीठावर हजेरी लावली. तो त्याने कलाकारांची ओळख करून देण्यासोबतच शाहरुखने डान्स केले. त्याने आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसह ‘झुमे जो पठाण’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
King Khan 🤝 King Kohli
When two kings meet, the stage is bound to be set on fire 😍#TATAIPL 2025 opening ceremony graced with Bollywood and Cricket Royalty 🔥#KKRvRCB | @iamsrk | @imVkohli pic.twitter.com/9rQqWhlrmM
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायणची शतकी भागीदारी –
अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांच्या शतकी भागीदारीमुळे, केकेआरने आरसीबीसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात केकेआरची सुरुवात धक्कादायक झाली. पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट्स घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. सुनील आणि अजिंक्य यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेट्ससाठी ५५ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी झाली. कर्णधार रहाणेने फक्त २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३१ वे अर्धशतक झळकावले. तो ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४४ धावा केल्या.
केकेआरची मधली फळी ढेपाळली –
यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी एकामागून एक विकेट्स गमावल्या. अंगकृष रघुवंशीने ३०, वेंकटेश अय्यरने सहा, आंद्रे रसेलने चार, हर्षित राणाने पाच धावा केल्या. दरम्यान, रमनदीप सिंग सहा धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, केकेआरने २० षटकांत आठ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.