IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 मेगा लिलावात अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. तसेच अनेक खेळाडू सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अनसोल्ड राहिले पण शेवटी सोल्ड झाले. या यादीत टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणेच्या नावाचाही समावेश आहे. रहाणेसह मोईन अली आणि उमरान मलिक यांनाही अखेर खरेदी करणारे संघ भेटले आणि कोलकाता नाईट रायडर्सने या तिन्ही खेळाडूंची प्रतिष्ठा राखत त्यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं.
अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळेस सुरुवातीच्या फेरीत तो अनसोल्ड राहिला. मात्र, अखेर केकेआरने त्याला विकत घेतले. रहाणेची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. तो केवळ मूळ किंमतीसह केकेआरमध्ये सामील झाला आहे.
Eden awaits you once again, Ajju Bhai! 💜 pic.twitter.com/X3ot9bF9jm
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 26, 2024
मोईन अली बराच काळ चेन्नई सुपर किंग्जसोबत होता. तो गेल्या मोसमात 8 कोटी रुपये मानधन घेऊन खेळला होता. पण यावेळी सीएसकेने त्याला रिटेन केले नाही. आता तो कोलकाताकडून खेळणार आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोईनची विक्री झाली नाही. उमरानच्या बाबतीतही असेच घडले. उमरान मलिकला सुरुवातीला कोणीही विकत घेतले नव्हते. पण शेवटी KKR ने 75 लाखांच्या बेस प्राईससह त्याला विकत घेतले तर मोईनला 2 कोटी रुपयांची मूळ किंमत देऊन खरेदी करण्यात आले.
केकेआरने व्यंकटेश अय्यरवर खर्च केले पैसे…
केकेआरकडे 23.75 कोटींचा सर्वात महागडा खेळाडू आहे. कोलकाताने व्यंकटेश अय्यरला सर्वाधिक पैसे दिले. संघाने मेगा लिलावात एनरिक नोर्खियाच्या रूपाने दुसरा सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला. केकेआरने नोरखियासाठी 6.50 कोटी रुपये खर्च केले तर क्विंटन डी कॉकला 3.60 कोटींना विकत घेतले.
कोलकाता नाईट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, अजिंक्य रहाणे, रमणदीप सिंग, क्विंटन डी कॉक, गुरबाज, एनरिक नोरखिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीत सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक.