IPL 2025 Mega Auction (Vaibhav Suryavanshi) :- राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीवर मोठा दाव लावला आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात राजस्थानने वैभवला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याला मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम मिळाली आहे. आयपीएल लिलावात विकला जाणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तो अवघ्या 13 वर्षांचा असून त्याने लहान वयातच अनेक विक्रम केले आहेत. वैभवने अंडर 19 टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे.
Vaibhav Suryavanshi, all of 13 years old, entering the IPL! 💗😂 pic.twitter.com/ffkH73LUeG
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 25, 2024
वैभवसाठी लिलावात दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थानशी झाला. पण राजस्थानने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने वैभववर पहिली बोली लावली. दिल्लीने एक कोटी रुपयांपर्यंतची बोली लावली होती. त्यानंतर राजस्थानने त्याला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत फक्त 30 लाख रुपये होती.
अंडर 19 टीम इंडियासाठी वैभवने झळकावले आहे शतक…
वैभव हा मूळचा बिहारचा आहे. त्याने 2023 मध्ये रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने वयाच्या 12 वर्षे आणि 284 दिवसांमध्ये पदार्पण सामना खेळला. आता तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वैभवने भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी स्फोटक कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियासाठी शतक झळकावले. वैभवने चेन्नईमध्ये अंडर 19 ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सामना खेळला होता. यामध्ये शतक झळकावले. वैभवने अवघ्या 62 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या होत्या.
राजस्थानने ‘या’ खेळाडूंवर खर्च केला पैसा..
राजस्थानने लिलावात जोफ्रा आर्चरच्या रूपाने सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला. संघाने आर्चरला 12.50 कोटी रुपयांना खरेदी केले. राजस्थानने तुषार देशपांडेला 6.50 कोटींना खरेदी केले. तर वानिंदू हसरंगाला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले. महिश थीक्षणा याला 4.40 कोटींना विकत घेतले. नितीश राणाही राजस्थानचा भाग बनला आहे. त्याला 4.20 कोटीं रूपये मिळाले.