SRH vs MI सामन्यात शोकाकुल वातावरण; बीसीसीआयचा संवेदनशील निर्णय, ‘या’ गोष्टींवर घातली बंदी

SRH vs MI both team Mourns Pahalgam Terror Attack : आयपीएल २०२५ मधील ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांसाठी शोक व्यक्त केला जात आहे. हा सामना खेळण्यासाठी खेळाडू आणि समालोचक काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले आहेत. सामन्यात कोणतेही चीअरलीडर्स नसतील आणि आतषबाजीही होणार नाही. टॉस दरम्यान, जेव्हा मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स मैदानावर आले तेव्हा त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या.
आयपीएल सामन्याबद्दल व्यक्त केला जात आहे शोक –
पहलगाम हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळले गेले आहे. ही माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आधीच दिली होती. त्यांनी सांगितले की दोन्ही संघ पीडितांना श्रद्धांजली वाहतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून खेळतील आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळतील.’
🚨 Toss 🚨 @mipaltan elected to field against @SunRisers. #MI captain Hardik Pandya and #SRH captain Pat Cummins condemn the gruesome Pahalgam terror attack and pay homage to the victims. #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/qfgPeWpmIF
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
या सामन्यात चीअरलीडर्स डान्स करताना दिसणार नाहीत –
Let’s all stand for peace and humanity.
A minute’s silence was observed in Hyderabad to pay respect to the victims of Pahalgam terror attack.
All the players, support staff, commentators & match officials are wearing black armbands for tonight’s game. #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/PIVOrIyexY
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
सूत्रांनी पुढे सांगितले की, मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात कोणतेही चीअरलीडर्स नसतील. तसेच, फटाके फोडले जाणार नाहीत. याचा अर्थ असा की सामन्यात कमी मनोरंजन असेल. पीडितांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. विराट कोहली आणि अनेक खेळाडूंनी या हल्ल्याबद्दल आधीच दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निकोलस पूरनची घसरण, तर पर्पल कॅपवर कोणाचे वर्चस्व? जाणून घ्या
मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन मैदानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) यांनी स्वीकारली आहे.





