IPL 2025 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निकोलस पूरनची घसरण, तर पर्पल कॅपवर कोणाचे वर्चस्व? जाणून घ्या

IPL 2025 Orange and Purple Cap Updated List : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२५ च्या ४० व्या सामन्यानंतर साई सुदर्शनने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वर्चस्व गाजवले. खरं तर, लखनौ विरुद्ध दिल्ली सामन्यात निकोलस पूरनला मोठी खेळी खेळण्याची आणि ऑरेंज कॅप पुन्हा मिळवण्याची संधी होती, परंतु या सामन्यात एलएसजीचा हा फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. पूरण अजूनही यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला आता त्याची आघाडी वाढवण्याची संधी आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात निकोलस पूरन फक्त ९ धावा करून बाद झाला. यासह, त्याने आयपीएल २०२५ मध्ये ८ सामन्यांमध्ये ३६८ धावा केल्या आहेत आणि तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ४१७ धावांसह यादीत अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा हा फलंदाज या हंगामात ४०० धावांचा टप्पा ओलांडणारा आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीमधील फलंदाज –
🔥 The 2025 Orange Cap race just got intense!
Sai Sudharsan has surged past Nicholas Pooran to lead the charts with 417 runs from 8 matches!Consistency and class on full display. Who will claim the crown? 🏏#Orangecap #IPL2025 @IPL pic.twitter.com/MxXcZG2RvU
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 23, 2025
- साई सुदर्शन – ८ – ४१७ – ५२.१२ -१५२.१९
- निकोलस पूरन – ८ – ३६८ ५२.५७ – २०५.५९
- जोस बटलर – ८ – ३५६ – ७१.२ १६५.५८
- सूर्यकुमार यादव – ८ -३३३ – ५५.५ – १६२.४४
- विराट कोहली – ८ – ३२२ – ६४.४ – १४०
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराटने व्यक्त केला शोक; म्हणाला, ‘या क्रूरतेची शिक्षा…’
पर्पल कॅपबद्दल बोलायचे, तर या यादीत गुजरात टायटन्सचा खेळाडू पहिल्या स्थानावर आहे. प्रसिद्ध कृष्णा हा आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, त्याने या हंगामात १६ विकेट्स घेतल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध काही विकेट्स घेत कुलदीप यादवला त्या टप्प्याजवळ जाण्याची संधी होती पण ती हुकवली. कुलदीपच्या नावावर सध्या १२ विकेट्स आहेत, तो लखनौविरुद्ध त्याचे विकेट्सचे खातेही उघडू शकला नाही.
त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा नूर अहमद आहे, त्याच्या पण खात्यात १२ विकेट्स आहेत. त्याचबरोबर साई किशोर आणि जोश हेझलवूड तितक्याच विकेट्स अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या सर्वांनी फक्त आठ सामन्यात १२ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा – Nicholas Pooran : आधी डोकं फोडलं, मग भेटायला बोलावलं; निकोलस पूरन आणि त्याच्या फॅनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
पर्पल कॅपच्या शर्यतीमधील गोलंदाज –
- प्रसिद्ध कृष्ण – ८ – १६ – १४.१२
- कुलदीप यादव – ७ – १२ – १४.५८
- नूर अहमद – ८ – १२ – १७.२५
- साई किशोर – ८ -१२ – १६.३३
- जोश हेझलवूड – ८ – १२ – २०.१७





