KKR vs RCB : मैदानात जाऊन विराटला भेटणं चाहत्याला पडलं महागात! खावी लागली जेलची हवा

IPL 2025 KKR vs RCB A fan who breached to meet Virat Kohli has been arrested : आयपीएल २०२५ मधील पहिला सामना २२ मार्च रोजी केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात खेळला गेला. आरसीबीने केकेआरवर ७ विकेट्सनी मात करत पहिल्याच सामन्यात बाजी मारली. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार अर्धशतक झळकावल्यानंतर त्याचा एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांचा घेरा भेदून मैदानात प्रवेश केली. यानंतर तो कोहलीच्या पाया पडला. मात्र, त्यानंतर हा स्टंट करणे, त्या चाहत्याला चांगलेच महागात पडले आहे.
चाहत्याला विराटला भेटणे पडले चांगलेच महागात –
केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आला. सामन्यात आरसीबी फलंदाजी करत असताना, एका चाहत्याने मैदानात प्रवेश करत विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केला, जे आता त्याला चांगलेच महागात पडले आहे. हा कृतीसाठी सुरक्षा रक्षकाने या चाहत्याला पहिल्यांदा मैदानातून बाहेर काढले. यानंतर रेव्ह स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, या चाहत्याला आता कलम ३२९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
विराट कोहलीची शानदार फलंदाजी –
A fan who breached to meet Virat Kohli at Eden Gardens has been arrested under section 329. [RevSportz] pic.twitter.com/AnO0ZN7U8z
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2025
या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज म्हणून त्याने उत्कृष्ट खेळी साकारली. विराटने ३६ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. पहिल्याच सामन्यात, विराटने शानदार फलंदाजी करून दाखवून दिले की तो आगामी सामन्यांमध्ये आरसीबीसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहे. या सामन्यात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने जवळजवळ स्टेडियमच्या सर्व क्षेत्रात तुफान फटकेबाजी केली.
अशी होती सामन्याची स्थिती –
या सामन्यात केकेआरने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७४/८ धावा केल्या होत्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ५६ धावांची खेळी केली, यानंतर प्रत्युत्तरात आरसीबीने फक्त १६.२ षटकांत धावांचा पाठलाग केला. अशा प्रकारे आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात उत्तम शैलीत केली आहे.





