IPL 2025 Auction: रीलीज व रिटेन खेळाडूंबाबत महत्वाचे घेणार निर्णय; BCCIची ‘या’ तारखेला होणार महत्वपूर्ण बैठक…

IPL 2025 Auction:- बीसीसीआयने आयपीएल संघांच्या मालकांची बैठक बोलावली आहे, जी 16 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या वर्षी होणारा मेगा लिलाव आणि खेळाडू कायम ठेवण्याची संख्या यावर बैठकीत चर्चा होणार आहे. यावर्षी होणाऱ्या मेगा लिलावात कायम ठेवलेल्या खेळाडूंची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. आयपीएल संघ मालकांची याबाबत वेगवेगळी मते आहेत. संख्येबाबत स्पष्ट एकमत नाही आणि बीसीसीआयला त्यावर बोलणी करायची असल्याचे मानले जात आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, गोष्टी अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. बीसीसीआय लीग पुढे नेण्यासाठी काम करत आहे. यामध्ये खेळाडू टिकवणे महत्त्वाचे आहे. मेगा लिलावापूर्वी 8 खेळाडूंना कायम ठेवता यावे यासाठी बहुतांश संघ मालक या निर्णयाला पाठिंबा देत आहेत.
सध्या, लिलावासाठी राखून ठेवण्याच्या नियमांनुसार, एक संघ जास्तीत जास्त 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्याच वेळी, राईट टू मॅच (RTM) कार्डसह खेळाडू जोडला जाऊ शकतो. अशा स्थितीत संघांना पाच खेळाडू कायम ठेवण्याची संधी मिळते. कोणत्याही संघाला जास्तीत जास्त २ परदेशी खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे.
संघांना पर्सची रक्कम देखील वाढवायची आहे
याशिवाय, संघांना लिलाव पर्स देखील वाढवायची आहेत. मेगा लिलावात लिलावासाठी सध्या प्रत्येक संघाकडे ९० कोटी रुपये आहेत. फ्रँचायझींना ते ९० कोटींवरून १०० कोटी रुपये करायचे आहे.
दरम्यान, आयपीएलच्या १७ व्या मोसमात पंजाब किंग्जला तिसरा पराभव पत्करावा लागला. मोहाली येथील घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादने संघाचा २ धावांनी पराभव केला. या विजयानंतरही, हैदराबाद गुणतालिकेत क्रमांक ५ आणि पंजाब किंग्ज क्रमांक ६ वर कायम आहे. मात्र, हैदराबादने २ गुणांची निश्चितच वाढ केली. आयपीएलच्या एका रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. पंजाबला शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती, संघाला २६ धावा करता आल्या आणि जवळचा सामना गमावला. मंगळवारी मोहालीमध्ये पंजाबची सुरुवात या पराभवाचे प्रमुख कारण होते, या संघाने पॉवरप्लेमध्ये हंगामातील सर्वात कमी धावसंख्या केली.

