IPL 2025 KKR vs RCB : आयपीएलचा पहिलाच सामना रद्द होणार? जाणून घ्या काय आहे कारण?

IPL 2025 KKR vs RCB will rain interrupt game : आयपीएल २०२५ चा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. मात्र, आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पाऊस चाहत्यांची निराशा करू शकतो. कोलकातामध्ये मुसळधार पावसाचा शक्यात आहे. ज्यामुळे पुढील काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पाऊस अडथळा ठरु शकतो. ज्यामुळे सामना रद्दही होऊ शकतो.
पहिल्या सामन्यात पाऊस ठरु शकतो अडथळा –
आयपीएलच्या आगामी हंगामाचा पहिला सामना रविवारी (२२ मार्च) होणार आहे. या सामन्यापूर्वी एक रंगारंग कार्यक्रम होण्याची अपेक्षा आहे. यानंतर रात्री साडेतसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मात्र, मुसळधार पाऊस आणि वादळामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. आयएमडीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये ४०-५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केकेआरसमोर जेतेपद राखण्याचे आव्हान –
CAN. NOT. WAIT! 🤩
ONLY 1️⃣ Sleep Away 🥳#TATAIPL 2025 is nearly here ⏳ pic.twitter.com/lU533Z64Nu
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2025
कोलकाता नाईट रायडर्स यावेळी गतविजेत्या म्हणून स्पर्धेत प्रवेश करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, संघाने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ला हरवून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते. ज्यामुळे केकेआर आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) प्रत्येकी पाच जेतेपदांसह आघाडीवर आहेत. यंदा केकेआरचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा – सीएसके-आरसीबी नव्हे, तर ‘हे’ चार संघ IPL 2025 च्या प्लेऑफ्समध्ये पोहोचणार; वीरेंद्र सेहवागचं मोठं भाकीत
आरसीबीसमोर पहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान –
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यावेळी त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. संघाची गोलंदाजी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे, परंतु यावेळी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडच्या आगमनाने गोलंदाजी आक्रमणाला बळकटी मिळाली आहे. तथापि, त्यांच्याकडे फिरकी विभागात कोणतेही मोठे नाव नाही. कृणाल पंड्या हा मुख्य फिरकी गोलंदाज असेल, पण संघाला अजूनही अशा फिरकी गोलंदाजाची गरज आहे, ज्याच्याकडे सामना जिंकून देण्याची क्षमता असेल.





