Indian Premier League 2024 (LSG vs DC Match 26) – लखनौ येथील एकना स्टेडीयमवर आयपीएल 2024 चा 26वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौची स्थिती अजूनही चांगली आहे, पण ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी आत्तापर्यंत अत्यंत वाईट राहिलेली आहे.
लखनौने एकना स्टेडियमला आपला बालेकिल्ला बनवला आहे. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत लखनौने येथे खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. लखनौने प्रथम पंजाब संघाला पराभूत करण्यात यश मिळवले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सचा पराभव केला.
मनोरंजक गोष्ट म्हणजे इथे झालेले सामने खूप उच्च स्कोअरिंग झालेले नाहीत. पहिल्या सामन्यात लखनौच्या संघाने 199 धावा केल्या आणि त्यानंतर पंजाबचा संघ 178 धावा करू शकला. एलएसजीने हा सामना 21 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात एलएसजीने 163 धावा केल्या, परंतु संपूर्ण जीटी संघ केवळ 130 धावा करू शकला होता.
LSG vs DC : Pitch Report
त्यामुळे, एकना स्टेडियमची खेळपट्टी संथ मानली जाते. म्हणजेच येथे फिरकीपटू आपली जादू दाखवताना दिसतात. वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला दडपण निर्माण केले नाही, तर फलंदाज मोठ्या धावा करू शकतात, परंतु त्यांना प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंपासून निश्चितच दूर राहावे लागेल. कोणताही संघ नाणेफेक जिंकेल, येथे प्रथम फलंदाजी करण्याचा विचार नक्कीच करेल. नंतर फलंदाजी करणे येथे अधिक कठीण होऊ शकते. येथे प्रथम फलंदाजी करताना 180 ते 190 धावा झाल्या तर प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकणे फार कठीण जाऊ शकते.
LSG vs DC : लाइव स्ट्रीमिंग
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
LSG vs DC : Head to Head Records…
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात IPL मध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला एकही सामना जिंकता आलेला नाही.
IPL 2024 : …तर ‘यशस्वी जैस्वाल’साठी T20 World Cup 2024 चा मार्ग होणार खडतर
IPL 2024 : दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती…
दरम्यान, जर आपण दोन्ही संघांच्या अलीकडील गुणतालिकेबद्दल बोललो तर एलएसजीने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 6 गुण आहेत. सध्या संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्लीने आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यासह, संघ दोन गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार असून जो संघ चांगली कामगिरी करेल तो जिंकेल.