IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1) : फिल सॉल्ट परतला मायदेशी, केकेआर संघात ‘या’ खेळाडूला मिळू शकते सलामीची जबाबदारी…

IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1) : आयपीएल 2024 चा क्वालिफायर-1 सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात (21 मे,मंगळवार) होणार आहे. केकेआर संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. फिल सॉल्टने चालू हंगामात केकेआरसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. पण आयपीएलच्या प्लेऑफपूर्वीच तो इंग्लंडला परतला आहे. अशा परिस्थितीत सॉल्टच्या जागी सलामीची जबाबदारी कोण घेणार, हा सर्वात मोठा प्रश्न केकेआरच्या व्यवस्थापनासमोर असेल.
फिल सॉल्टने आयपीएल 2024 च्या 12 सामन्यांमध्ये एकूण 435 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून एकूण 4 अर्धशतके झाली आहेत. आता तो इंग्लंडला परतला आहे, कारण T20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्याचा इंग्लंड संघात समावेश आहे. सॉल्टची भरपाई करणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे होणार नाही. चालू मोसमात केकेआरच्या यशात सॉल्टचा मोठा वाटा आहे.
phil salt replacement : ‘या’ खेळाडूला मिळू शकते सलामीची जबाबदारी..
केकेआर संघात एक खेळाडू आहे जो फिल सॉल्टच्या जागी सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो. आम्ही बोलत आहोत अफगाणिस्तानचा युवा फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याच्याबद्दल. या मोसमात तो केकेआरसाठी एकही सामना खेळला नाही, पण गेल्या मोसमात तो आपल्या कामगिरीने छाप पाडण्यात यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्याने एकूण 227 धावा केल्या होत्या. तो सुनील नरेनचा नवा सलामीचा जोडीदार बनू शकतो. त्याच्याकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे.
IPL 2024 मध्ये KKR ने केली दमदार कामगिरी…
आयपीएलच्या इतिहासात केकेआर संघाने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाला यापूर्वी असे करता आले नव्हते. चालू हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी केली आहे. 14 पैकी 9 सामने जिंकून संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. दरम्यान, केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.





