IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : कोलकाता करणार प्रथम फलंदाजी, आरसीबीमध्ये 3 मोठे बदल, जाणून घ्या Playing 11…

IPL 2024, Live Cricket Score, KKR vs RCB : आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आमने-सामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआरने या मोसमात आरसीबीचा पराभव केला होता आणि ते त्यांची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर चालू हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजयाची नोंद करणे आवश्यक आहे.
तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Royal Challenge Bengaluru win the toss and elect to field against Kolkata Knight Riders) कोलकाता संघ आता प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.
🚨 Toss Update 🚨
Royal Challenge Bengaluru win the toss and elect to field against Kolkata Knight Riders.
Follow the Match ▶️ https://t.co/hB6cFsk9TT#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/zHursZllCj
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
आरसीबीने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये तीन बदल केले आहेत, तर केकेआरने संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेरून ग्रीन, मोहम्मद सिराज आणि करण शर्मा यांचे आरसीबी संघात पुनरागमन झाले आहे.
KKR vs RCB Live : दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनीर नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा. इम्पॅक्ट सब : सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, करण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज.
इम्पॅक्ट सब : सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग.
केकेआरचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, 6 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफसाठी स्वत:ला मजबूत करायचे आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ खराब फॉर्ममधून जात आहे. आरसीबीने 7 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये ते तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आता येथून प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आरसीबीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
IPL 2024 (DC vs SRH Match 35) : हैदराबादचा शानदार विजय, दिल्लीला 67 धावांनी केलं पराभूत…
KKR Kings vs RCB : Head to Head Records…
KKR आणि RCB यांच्यातील हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर दोघांमध्ये आतापर्यंत 33 IPL सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी बेंगळुरूने 14 आणि कोलकाताने 19 सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमात केकेआरने दोन्ही सामने जिंकले होते. या मोसमात आरसीबी आणि केकेआर दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात केकेआरने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला.





