Indian Premier League 2024, Gujarat Titans : आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गेल्या हंगामातील अंतिम संघांमध्ये सामना होणार नाही. गेल्या मोसमातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. गुजरातला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातच्या गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली होती. मोसमात सर्वाधिक बळी घेणारे पहिले तीन गोलंदाज हे गुजरातचे होते. या वेळीही हे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांवर कहर करू शकतात आणि जे कोणत्याही विरोधी संघाचा फलंदाजीक्रम उद्ध्वस्त करू शकतात. 1. मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) – आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मोहम्मद शमी अव्वल स्थानावर आहे. शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या होत्या. 4 विकेट आणि 11 धावा ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. शमीने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली होती. मात्र यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. तो अजूनही टीम इंडियातून बाहेर आहे. शमी आयपीएलसाठी तंदुरुस्त राहिल्यास विरोधी संघांच्या अडचणी वाढू शकतात. 2. मोहित शर्मा ( Mohit Sharma )- आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्मा स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. मोहितने 14 सामन्यात 27 विकेट घेतल्या होत्या. त्याने अनेक सामन्यांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. एका सामन्यात 5 विकेट आणि 10 धावा देणे ही मोहितची सर्वोत्तम कामगिरी होती. यावेळीही मोहित गुजरातसाठी गेम चेंजर ठरू शकतो. तो अनुभवी गोलंदाज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही अनुभव आहे. त्यामुळे तो परदेशी खेळाडूंनाही धोकादायक ठरू शकतो. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bangladesh-bowler-sujon-mahmud-bowls-bizarre-over-concedes-92-runs-in-four-deliveries/ 3. रशीद खान ( Rashid Khan ) – गुजरात टायटन्सचा गोलंदाज रशीद खानने अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीतही निष्णात आहे. गेल्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत राशिद तिसऱ्या स्थानावर होता. राशिदने 17 सामन्यात 27 विकेट घेतल्या होत्या. 4 विकेट आणि 30 धावा ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. रशीद या वर्षी जानेवारीत दुखापतग्रस्त झाला होता. या कारणास्तव पाकिस्तान सुपर लीग 2024 मध्ये खेळला नाही. मात्र त्याच्या परतण्याबाबत सध्या कोणतेही अपडेट मिळालेले नाही.