iPhone 16 Plus : आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट! महागडा फोन मिळणार स्वस्तात, किंमत पाहा….

iPhone 16 Plus | Flipkart : जर तुम्ही मोठ्या डिस्प्लेसह आयफोन १६ प्लस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर मोठी सूट उपलब्ध आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट १६ प्लसवर उत्तम सूट देत आहे. याशिवाय, आयफोनच्या किमतीत मोठ्या कपातीसोबतच बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला आयफोन १६ प्लसवर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल सांगत आहोत….
आयफोन १६ प्लसचा १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ७९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे, तर तो ८९,९०० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १०% सूट (४,००० रुपयांपर्यंत) मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत ७५,९९९ रुपये होईल.
याशिवाय, तुमचा जुना फोन एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन तुम्ही ४०,१५० रुपयांची सूट मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा हा बदल्यात दिलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो. हा फोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा १३,००० रुपयांनी स्वस्तात उपलब्ध आहे.
आयफोन १६ प्लसमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. हा आयफोन iOS 18 वर काम करतो. हा आयफोन अगदी नवीन ऑक्टा कोअर A18 चिपसेटने सुसज्ज आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोन IP68 रेटिंगसह सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअपसाठी, १६ प्लसच्या मागील बाजूस ४८-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे .जो f/१.६ अपर्चर आणि २x इन-सेन्सर झूमसह सुसज्ज आहे.
१२-मेगापिक्सेलचा २x टेलीफोटो लेन्स आहे जो f/१.६ अपर्चरसह आहे आणि १२-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर १२-मेगापिक्सेलचा ट्रूडेप्थ शूटर समाविष्ट करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ, GPS आणि NFC सपोर्ट यांचा समावेश आहे.






