निमंत्रित क्रिकेट स्पर्धा | डेक्कन जिमखाना संघाची आगेकूच

पुणे :- पाथ-वे फाउंडेशन आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत डावखुरा जलदगती गोलंदाज आत्मन पोरे (4-20)ने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह धीरज फटांगरे(नाबाद 60) याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने युनायटेड स्पोर्टस क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
या लढतीत युनायटेड स्पोर्टस क्लब संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेक्कन जिमखानाच्या आत्मन पोरे 4-20, अजय बोरुडे 2-31, ओंकार साळुंखे 2-27, प्रकाश चौधरी 1-14) यांच्या गोलंदाजीपुढे युनायटेड स्पोर्टस क्लबचा डाव 40 षटकात सर्वबाद 140 धावांवर संपला.
हे आव्हान डेक्कन जिमखाना संघाने 14 षटकात 1 गडी गमावून 142 धावा करत पूर्ण केले. यात धीरज फटांगरेने 38 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारासह नाबाद 60 धावा व हर्ष सांघवीने 30 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह नाबाद 51 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक – (साखळी फेरी) : युनायटेड स्पोर्टस क्लब : 40 षटकात सर्वबाद 140 धावा. (रामकृष्ण घोष 39, आतिश भांबरे 38, अमन मुल्ला नाबाद 27, रोनक राठी 16, आत्मन पोरे 4-20, अजय बोरुडे 2-31, ओंकार साळुंखे 2-27, प्रकाश चौधरी 1-14) पराभूत वि. डेक्कन जिमखाना :14 षटकात 1 बाद 142 धावा. (धीरज फटांगरे नाबाद 60, हर्ष सांघवी नाबाद 51, यश बोरामणी 24, आदित्य राजहंस 1-11). सामनावीर – आत्मन पोरे.




