ब्रिटनमध्ये तयार झाले अदृश्य कवच; माणूस होऊ शकतो क्षणात गायब

लंडन : एखादा कोट किंवा शर्ट परिधान करून अदृश्य होण्याची कल्पना फक्त चित्रपटात असली तरी आता तो प्रत्यक्षात उतरली आहे. ब्रिटनमधील एका कंपनीने असे कवच तयार केले आहे, त्याच्यापुढे उभे राहिल्यास माणूस क्षणात गायब होऊ शकतो. हे अदृश्य कवच म्ह्म्णजे प्रत्यक्षात एक प्लॅस्टिकची शीट आहे.
हे प्लास्टिक पारदर्शी असून ऑप्टिकल लेन्सचा वापर करून हे कवच बनवण्यात आले आहे. आयफेल सायन्स या मासिकात याबाबत लेख प्रसिद्ध झाला आहे. ऑप्टिकल लेन्समुळे प्रकाश अतिशय चातुर्याने परावर्तित होतो, त्यामुळे शीट च्या पलीकडे उभी असलेली व्यक्ती दिसत नाही.
ज्या कंपनीने हे शिल्ड तयार केले आहे त्या कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, या शिल्डच्या मागे माणूस १०० मीटर अंतरावर उभा राहिला तरी तो गायब झाल्याचे दिसेल या एका शिल्डची किंमत साधारण ५००० ते ३०००० रुपये आहे. यापूर्वीही अशी उत्पादने बाजारात आली होती पण नंतर काही समस्या उदभवल्याने हि उत्पादने बाजारात टिकू शकली नाहीत, त्यामुळे या कंपनीने फक्त २५ कवच तयार केली आहेत.





