संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी आज गुन्हे शाखेकडून चौकशी ; जखमी खासदारांची घेणार भेट?

parliament protest। देशाच्या संसदेत कथित धक्काबुक्की प्रकरणाने राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकरणी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी जखमी भाजप खासदारांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात. याशिवाय संसदेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी गुन्हे शाखेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दिल्लीतील चाणक्यपुरी येथील ISC युनिट या प्रकरणाचा तपास करत आहे.
संसदेतील धक्कबुक्कीची अत्यंत गंभीरपाने दखल घेतल्यामुळे गुन्हे शाखेने एसआयटी स्थापन केली होती. त्या एसआयटीमध्ये दोन एसीपी, दोन निरीक्षक आणि तीन उपनिरीक्षक ठेवण्यात आले होते. हे सर्व अधिकारी थेट डीसीपींना अहवाल देतील, असे सांगण्यात आले.
राहुल गांधींना नोटीस नाही कारण… parliament protest।
क्राईम ब्रँच राहुल गांधींना नोटीस पाठवण्याची घाई करणार नाही. आपल्या तक्रारीत भाजपने निश्चितपणे राहुल गांधींवर थेट आरोप केले आहेत आणि त्यांच्या बाजूने धक्काबुक्की झाल्याचा आग्रह धरला आहे. मात्र प्रोटोकॉलचा विचार करून आधी सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील, त्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि जखमी खासदारांचे जबाबही नोंदवले जातील. हा तपास पूर्ण झाल्यावरच एसआयटी राहुल गांधींना नोटीस पाठवू शकते.
नेमकं काय झालं ? parliament protest।
देशाच्या संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधान केल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी संसदेच्या परिसरात आंदोलन सुरु केले होते. तर त्याच विरोधाला विरोध करण्यासाठी भाजपचे काही खासदार देखील संसदेच्या आवारात निदर्शने करत होते. याच वेळी दोन्ही गटाकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी आहेत. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे हे खासदार जखमी झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. तर काँग्रेसने भाजपचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.





