नवी दिल्ली – कानपूरच्या साजेती परिसरात दारू पिऊन शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकवेळा हा शिक्षकाने असे कृत्य केल्याचे विद्यार्थिनी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. नशेच्या आहारी गेलेल्या शिक्षिकाने पाठलाग करत वर्गात जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थांनी केला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,’घाटमपूरच्या साजेती पोलीस ठाण्यांतर्गत समुही भाटपुरवा येथील प्राथमिक शाळेत गुरुवारी ही घटना घडली. जिथे मद्यधुंद शिक्षकाने महिला शिक्षकांना शिवीगाळ केली आणि नंतर विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळही केली. यानंतर उपस्थित शिक्षकांनी आणि विध्यार्थानी मिळून मद्यधुंद शिक्षकाला खोलीत बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे की, ‘गुरुवारी रणविजय यादव शिक्षक दारूच्या नशेत शाळेत पोहोचले. जिथे त्याने दारूच्या नशेत आक्षेपार्ह कृत्य करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थही शाळेत पोहोचले. यावेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मद्यधुंद स्थितीत त्याने हे कृत्य केले.’
पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. त्याचबरोबर शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उच्च शिक्षण अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे.