धाकधूक वाढली.! थोड्याच वेळात भारत रचणार इतिहास; इस्रोमध्ये आता नक्की काय चाललंय पाहा….

नवी दिल्ली – भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे लागल्या आहेत. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. संपूर्ण आज देश खूप उत्साहित आहे. चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इस्रोने इतिहास रचावा, अशी देशवासियांची इच्छा आहे.
सध्या भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. आता इस्रो कडून लँडरला अंतिम कमांड देण्यात आली आहे. चांद्रयान-3 आजच लँडिंग होणार हे स्पष्ट आहे.
अंतिम कमांड दिल्यानंतर आता टायमिंगमध्ये कोणातही बदल करता येणार नाही. किलोमीटर उंचीवरुन पावर डीसेंट स्टार्ट होईल, ज्याला रफ ब्रेकिंग फेस म्हटलं जातं. तिथून लँडर चंद्राच्या पुष्ठभागापासून 7.4 किमी उंचीवर पोहोचेल.
विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर रँप उघडेल आणि त्यातून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला पहिला देश ठरणार आहे. इस्रोमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले असून इस्रोने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे आता इस्रोमध्ये काय वातावरण आहे हे स्पष्ट होत आहे.
चांद्रयान 2 मोहीम थोडक्यात झाली अपयशी…
दरम्यान, काही वर्षांपूर्वी भारताचं चांद्रयान 2 ही मोहीम थोडक्यात अपयशी झाली होती. यावेळी चंद्रावर हे विक्रम लँडर लँड होण्याआधीच इस्रोशी संपर्क तुटला होता. या अनुभवातून धडा घेत चांद्रयान 3 या मोहिमेत महत्त्वाचे बदल केले आहेत. चांद्रयान 2 या मोहिमेतील लँडरला पाच इंजिन होते.





