‘सिनेमातले इंटिमेट सिन्स अगदी सहजपणे करता आले, कारण….’, दीपिकानं सांगितला अनुभव

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘गहराइयां’ या सिनेमामुळं चांगलीच चर्चेत आहे. सिनेमात दीपिका आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांचे इंटिमेट सिन्स दाखविण्यात आले आहे. या सिन्सने सर्वांचेच लक्ष वेधले असून, हे सिन शूट करतानाचा आपल्याला आलेला अनुभव अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सांगितला आहे. ‘गहराइयां’ सिनेमा येत्या 11 फेब्रुवारी 2022 रोजी वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
दीपिका म्हणते की.., ‘सिनेमात दाखण्यात आलेले इंटिमेट सिन्स हे अगदी सहजपणे सादर करता आले, कारण या सिनेमाचे दिग्दर्शक शकुन बत्रा हे शूटिंग सुरू असलेल्या सेटवर वेगळं वातावरण निर्माण करत होते. त्यामुळे सिन शूट करायला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही’, असं दीपिकानं सांगितलं. यावेळी ती माध्यमांशी संवाद सडत होती.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील पाहिलं ‘डूबे’ गाणं रिलीज करण्यात आलं होत. यामध्ये तिचे सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन दिसून आले होते. संपूर्ण गाण्यात या दोघांची बोल्ड केमेस्ट्री दिसत आहे. ‘गहराइयां’ मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत अभिनेत्री अन्नया पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा एक रिलेशनशिप ड्रामा असून, तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं या सिनेमात पाहायला मिळणार आहे.





