Amardeep Kumar Gold : देशाला जिंकून दिली ४ सुवर्णपदके, पण पोटासाठी विकतोय भाजी! VIDEO व्हायरल झाल्याने सरकारला आली जाग
Amardeep Kumar Gold : . झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून क्रीडा विभागाला तातडीने मदत आणि नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत.

International Throwball Gold Medalist Amardeep Kumar Selling Vegetables : देशासाठी ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके जिंकूनही नशिबी मात्र भाजीचा गाडा आणि रात्रीची कॅब! झारखंड सरकारच्या बहुचर्चित ‘पदक आणा, नोकरी मिळवा’ योजनेचा बुरखा फाडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ वर्षीय आंतरराष्ट्रीय थ्रोबॉल चॅम्पियन अमरदीप कुमारवर ओढवलेली ही उपासमारीची वेळ पाहून संपूर्ण क्रीडा विश्व सुन्न झाले आहे. अखेर त्याचा संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खडबडून जागी झालेल्या प्रशासनाला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीने नोकरी व मदत देण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकांवर कोरले नाव; तरीही सरकारी मदतीची प्रतीक्षा –
अमरदीपने २०१५ मध्ये मलेशियात झालेल्या एशियन ज्युनियर थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर २०१७ मध्ये काठमांडूतील इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप, २०१९ मध्ये बंगळुरूमधील साउथ एशियन चॅम्पियनशिप आणि २०२६ मध्ये रांचीत झालेल्या साउथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये त्याने सलग सुवर्णपदक जिंकून देशाचा तिरंगा फडकवला. इतकी दैदिप्यमान कामगिरी करूनही त्याला आजतागायत हक्काची सरकारी नोकरी मिळालेली नाही.
अमरदीप कुमार
नाम सुनकर लगता है कोई कहानी होगी.. है भीचार बार विदेश गया, भारत की जर्सी पहनी, मलेशिया में थ्रोबॉल में गोल्ड जीतकर तिरंगा लहराया
झारखंड का नाम रोशन किया लेकिन आज वही अमरदीप रांची के अरगोड़ा चौक पर धनिया-मिर्च तौल रहा है खेल कोटा…Read news pic.twitter.com/SSFRnhySmq
— DINESH K SEN (@dks_230) September 1, 2026
आईच्या डोक्यावर ३५ किलो भाजी, रात्री कॅब चालवून सकाळी मैदानावर गाळतो घाम –
Amardeep Kumar once won a gold medal Throw-ball in Malaysia representing India, is now selling vegetables on the road.
Meanwhile a random child can secure the career of his 10 generetions just by chanting.
This is India, it doesn’t provide motivation to win for it. pic.twitter.com/CrCT9omvG5
— POL (@CptoneP) September 2, 2026
अमरदीपचे संपूर्ण कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. रांचीच्या अरगोडा चौकात अमरदीप भाजी विकतो, तर त्याची आई डोक्यावर ३५ किलो भाजीची पाटी घेऊन घरोघरी फिरते. मोठा भाऊ फास्ट फूडचा गाडा चालवतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याने ६५ हजार रुपयांचे कर्जही काढले होते. रात्री कुटुंबासाठी कॅब चालवून अपुऱ्या झोपेत तो सकाळी सरावासाठी मैदानावर पोहोचतो. २०२० पासून तो सरकारी नोकरी आणि रोख पुरस्कारासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे.
हेही वाचा – Misbah-ul-Haq : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ ! मिसबाह उल हकचा तडकाफडकी राजीनामा
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून दखल; ऑक्टोबरमध्ये पुन्हा मैदानात उतरणार –
झारखंड के 29 वर्षीय थ्रोबॉल खिलाड़ी अमरदीप ने देश के लिए 4 गोल्ड मेडल जीते।
रांची में सब्जी बेचने के साथ कैब भी चलाते हैं सरकारी नौकरी का इंतजार।
मलेशिया टूर्नामेंट के लिए भी उन्हें ₹65,000 का कर्ज लेना पड़ा था।#Amardeep #Throwball #Jharkhand #JharkhandSports pic.twitter.com/b4OM41kKdR
— News Corridors (@News_Corridors_) September 2, 2026
क्रीडा क्षेत्राची मान शरमेने खाली घालवणारी ही कहाणी व्हायरल होताच क्रीडामंत्री सुदिव्य सोनू आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्याला दिलासा दिला आहे. सध्याच्या क्रीडा धोरणानुसार त्याला नोकरी देण्याच्या पर्यायांवर काम सुरू झाले आहे. दुसरीकडे, या भीषण दारिद्र्यातही अमरदीपची जिद्द कायम असून तो ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पुन्हा सुवर्ण जिंकण्यासाठी कसून सराव करत आहे.





