International Shooting Sport Federation : – इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएसएफ) पंच समितीवर पुण्याच्या पवन सिंह यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. सिंह हे जागतिक नेमबाजी प्रशासनाच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव भारतीय ठरले आहेत. आयएसएसएफच्या पंच समितीच्या वतीने नेमबाजी स्पर्धांच्या नियमांची समान अंमलबजावणी करणे, पंच व परीक्षक (ज्युरी) सदस्यांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करणे आणि पंचांच्या परवानग्यांच्या मंजुरीवर देखरेख ठेवण्याचे काम केले जाते. या समितीत एकूण सात सदस्य आहेत. यापैकी पवन सिंग, चीनचे लॅन हँग आणि इटलीचे निकोला हे तीनच सदस्य यंदा निवडून आले आहेत. Men’s Junior Asia Cup 2024 : भारताची कोरियावर 8-1 ने मात, अव्वल स्थानासह निश्चित केले उपांत्य फेरीतील स्थान… पवन सिंह हे भारतातील एक अनुभवी नेमबाजी प्रशिक्षक असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक नेमबाजीचे चित्र बदलविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. सिंह हे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे (एनआरएआय) सहसचिव आणि गगन नारंग यांच्या गन फॉर ग्लोरी अकादमीचे सहसंचालक देखील आहेत. आयएसएसएफ पंचांच्या समितीवर सिंह यांची निवड झाल्याने त्यांचे कौशल्य आणि नेमबाजी खेळातील त्यांचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.