पवन सिंह आणि राजकुमार राव एकत्र लगावणार ठुमके; व्हिडिओ होतोय व्हायरल

Pawan singh And Rajkumar Rao | राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. यानंतर आता राजकुमार राव ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यातील एका गाण्याची चर्चा रंगली आहे. यात राजकुमार राव आणि पवन सिंह यांची जोडी खूपच गाजत आहे.
पवन सिंह आणि राजकुमार राव यांचा चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांसोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. पापाराझी हँडल विरल भयानीच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ’ सिनेमातील या नवीन गाण्याची झलक पाहून चाहतेही उत्सुक आहेत. लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
पवन सिंह हे भोजपुरी सिनेमातील मोठं नाव असून अभिनेता असण्याबरोबरच ते एक गायकही आहे. याआधी राजकुमार रावच्या स्त्री २ सिनेमातील ‘कटी रात’ या गाण्याला पवन सिंहने आवाज दिला होता. आता पुन्हा एकदा कमाल दाखवण्यास ते सज्ज झाले आहे. Pawan singh And Rajkumar Rao |
दरम्यान, राजकुमार राव या सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ११ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.





