International Day of Yoga : केसरी वाड्यात ‘योग विद्याधाम’चे योग वर्ग
Updated On:

International Day of Yoga। Pune : अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग विद्याधाम’ पुणे तर्फे लोकमान्य सभागृह ,केसरी वाडा येथे योग वर्ग घेण्यात आला. या वर्गावर 126 साधक संख्या होती या वर्गावर पूरक व्यायाम, योगासने ,प्राणायाम घेण्यात आला.
तसेच संस्थेचा योग प्रचार आणि योग प्रसार या उद्दिष्टानुसार वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. राजीव ढेरे, वैद्य लक्ष्मुण लावगनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. वर्ग तन्वी लोंढे व मंगेश गुजराथी यांनी घेतला.
योग विद्या धाम, पुणे ही संस्था 6 जून 1960रोजी स्थापन झाली आहे. योग विद्या धाम या संस्थेमध्ये गेली 65 वर्षे सकाळी सहा पासून संध्याकाळी आठ पर्यंत योग वर्ग योग उपचार चालू असतात. अत्यंत माफक आपण शुल्का मध्ये दररोज 275 – 300 योगसाधक अभ्यास करतात.





