Inter-University Kho-Kho Tournament : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सलग दोन विजय

Kho-Kho Tournament : महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो’ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑल म्हैसुर आणि लव्हली प्रोफेशन युनिव्हर्सिटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली.
महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मुकूंदनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सलग दोन विजय मिळवले. पहिल्या सामन्यात कोमल दारवटकर हिच्या खेळीच्या जोरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने युनिव्हर्सिटी ऑफ केरला संघाचा एक डाव आणि १० गुणांनी (१५-५) पराभव केला.
सामन्यात कोमल दारवटकर (४.०० मि.), प्रांजल मडकर (३.१० मि.), काजल भोर (४ गुण) आणि रूतिका राठोड (४ गुण) यांनी चमकदार खेळ केला. दुसर्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने हेमचंद यादव विश्वविद्यालय संघाचा एक डाव आणि ७ गुणांनी (१५-८) सहज पराभव केला. सामन्यात काजल भोर (३.०० मि., ५.०० मि.) मनिषा पादेर (३.०० मि.) आणि प्रियांका इंगळे (३ गुण) यांनी चांगला खेळ केला.
IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…
लव्हली प्रोफेशन युनिव्हर्सिटी संघाने बुरूदवान युनिव्हर्सिटी संघाचा एक डाव आणि ७ गुणांनी (१२-१०) पराभव केला. दुसर्या सामन्यात लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संघाने भारतीय युनिव्हर्सिटी संघाचा एक डाव आणि ७ गुणांनी (१२-५) पराभव करून सलग दोन विजय मिळवले. युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसुर संघाने सलग दोन विजय मिळवले. युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसुरने पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगढ संघाचा एक डाव आणि १५ गुणांनी (१६-१) सहज पराभव केला. दुसर्या सामन्यात युनिव्हर्सिटी ऑल म्हैसुरने वीर नर्मदा साऊथ गुजरात युनिव्हर्सिटी संघाचा एक डाव आणि ४ गुणांनी (१०-६) पराभव केला.


