धान्याचा पुरवठा करणाऱ्या कामगारांना देखील विम्याचे कवच

मुंबई : डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच दिल्यानंतर आता लॉकडाऊनच्या काळात धान्याचा पुरवठा करणाऱ्या कामगारांना देखील विम्याचे कवच देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काळात देशभरात धान्य पुरवठा करण्यासाठी काम करणार्या 80,000 कामगारांसह भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआय) 1,08,714 कामगार आणि अधिकारी यांना जीवन विमा संरक्षण देण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी देण्यात आली आहे.
याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, रामविलास पासवान यांनी नुकतीच घोषणा केली आहे. यावेळी पासवान यांनी, संकटाच्या काळात सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवण्यात गुंतलेल्या आमच्या कोरोना-योद्ध्यांना सर्वतोपरी सुरक्षा पुरविणे सरकार वचनबद्ध असल्याचे म्हटले.
या तरतुदीनुसार, 24 मार्च 2020 ते 24 सप्टेंबर, 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत कोविड 19 च्या संसर्गामुळे जर कोणी मरण पावला तर एफसीआयच्या कर्तव्यावर काम केल्यास नियमित एफसीआय कामगारांना 15 लाख रुपयांचे आजीवन कवच मिळेल, कंत्राटी कामगार 10 लाखांचा विमा, प्रवर्ग -1 अधिकारी 35 लाख रुपये, वर्ग 2 अधिकारी 30 लाख रुपये आणि वर्ग 3 अधिकारी आणि कामगार 25 लाख रुपयांचा हक्क असणार आहे.





