Pune District : भोलावडे-पसुरे रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवा
Updated On:

भोर : भोलवडे- पसूरे मार्गावर शहराच्या हद्दीत स्पीड ब्रेकर बसवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सकाळी पाच ते सहाच्या वेळी ज्येष्ठ नागरिक तरुण मॉर्निंग वॉकसाठी ये-जा करत असतात. याच वेळी पसुरे, म्हाळवडीकडून मोटार सायकलस्वार वेगाने जात असल्याने अंधारामुळे अपघात होत आहेत. दिवसेनदिवस अपघातात वाढ होत असल्याने हा रस्ता जीवघेणा ठरत आहे.
या मार्गावर वनविभागाच्या उद्यानाच्या वळणावर, सट्टाले यांच्या घरासमोर आणि श्रीरंग आवाळे यांच्या घरासमोर पुढे चौकात स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी होत आहे. या रस्त्याचे दुतर्फा वस्ती असून शाळकरी मुलांसाठीही हा रस्ता धोकादायक ठरत आहे.
या रस्त्यावर अनेक आपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून भोर पोलिसांनीही स्वैराचारी वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी होत आहे.





