म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन आता 1200 रुपयांत
Updated On:

नवी दिल्ली – ब्लॅक फंगस अर्थात म्युकर मायकोसिसवर उपचारासाठी वापरले जाणारे 7 हजार रुपयांचे आता केवळ 1200 रुपयांत मिळणार असल्याची एक चांगली बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन लॉन्च केले आहे.
देशात ऍम्फोटेरिसीन बी इमल्शन इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करीत होती. मात्र, आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्सदेखील हे इंजेक्शन तयार करणार आहे. जेनटेक लाइफ सायन्सची दररोज तब्बल 20 हजार वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे.
या औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकारने पाच आणखी कंपन्यांना या औषधाच्या निर्मितीसाठी परवाना उपलब्ध करून दिला आहे.





