“निरोगी जीवन निवडा”; शेफालीच्या निधनानंतर मल्लिका शेरावतचा चाहत्यांना सल्ला

Mallika Sherawat | बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने सध्या चित्रपटांपासून दूर आहे, पण ती फिटनेस आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मल्लिकाने मेकअपशिवाय, फिल्टरशिवाय आणि बोटॉक्स सर्जरीशिवाय तिचा नैसर्गिक लूक दाखवला आहे.
मलायकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बोटॉक्स आणि फिलर्सला टाळून नैसर्गिक सौंदर्याला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलत आहे. या व्हिडिओत ती म्हणते, “मी आत्ताच उठले आहे. मी एक सेल्फी व्हिडिओ बनवून तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याचा विचार केला. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी कोणताही फिल्टर वापरत नाही किंवा माझ्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही. मी केसही सेट केलेले नाहीत. हे आहे माझे नैसर्गिक सौंदर्य आहे. आपण सर्वजण बोटॉक्स, कृत्रिम कॉस्मेटिक फिलर्सना नाही म्हणू आणि निरोगी जीवन निवडू यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे,” असे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.
मल्लिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जणांनी तिच्या व्हिडिओला पाठिंबा दिला आहे. ‘नैसर्गिक सौंदर्य नेहमीच कृत्रिमपेक्षा चांगले असते,’ ‘ज्यांना नैसर्गिकरित्या सुंदर वाटते त्यांना काहीही करण्याची गरज नाही,’ ‘असा संदेश शेअर केल्याबद्दल धन्यवाद’, ‘खरं सौंदर्य तेच आहे, जे मेकअप आणि फिल्टरशिवायही चमकते,’ असशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. Mallika Sherawat |
दरम्यान, शेफाली जरीवालाच्या निधनाबाबतच्या तपासात असे दिसून आले आहे की ती गेल्या सात ते आठ वर्षांपासून एन्टी एजिंगची औषधे घेत होती. 27 जून रोजी तिच्या घरी पूजा असल्याने तिने उपवास ठेवला होता, परंतु तरीही तिने त्याच दिवशी दुपारी एन्टी एजिंग औषधाचे इंजेक्शन घेतले. याशिवाय तिने फ्रिजमधले अन्न खाल्ले होते. ही औषधे तिच्या अचानक मृत्यूचे कारण असू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाच:
आज पुन्हा सोन्याच्या किंमती घसरल्या ; वाचा महिन्याच्या शेवटच्या दिवशी किती आहे भाव ?





