अक्षम्य हलगर्जीपणा.! इंजेक्शन दिल्यानंतर ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
Updated On:

Uttar Pradesh – उत्तर प्रदेशच्या कोल्हुई येथील एका क्लिनिकमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच पोलिसांनी डॉक्टरवर कारवाईचे आश्वासन देऊन लोकांना शांत केले.
मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. सोनौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंघुसरी येथे राहणारी चांदनी (वय, ७) तीन दिवसांपासून तापाने त्रस्त होती.
गुरुवारी सायंकाळी चांदणीची आई संगीता उपचारासाठी एकसदवा येथील क्लिनिकमध्ये गेली. डॉक्टरांनी चांदनीला इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच चांदणीची तब्येत आणखी बिघडू लागली, असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. घरच्यांना काही समजेल तोपर्यंत चांदनी बेशुद्ध पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.





