अवघ्या 200 रुपयांसाठी पाकिस्तानी गुप्तहेराला पुरवली माहिती; गुजरातमधून एकाला घेतले ताब्यात

Gujarat Crime News | देशासोबत अवघ्या दोनशे रुपयांसाठी विश्वासघात केल्याने एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेल्या आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पुरवले होते. दीपेश गोहिल नावाचा व्यक्ती ओखा बंदरात काम करत होता आणि फेसबुकच्या माध्यमातून तो पाकिस्तानी हेराच्या संपर्कात होता.
गुप्तहेरने दीपेशशी फेसबुकवर ‘असिमा’ नावाने मैत्री केली आणि त्यानंतर ती व्हॉट्सॲपवरही त्याच्या संपर्कात राहिला. एजंटने दीपेशला ओखा बंदरात उभ्या असलेल्या तटरक्षक दलाच्या बोटीचे नाव आणि क्रमांक विचारला होता. याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने दीपेश गोहिलला अटक केली आहे. मात्र एजंटची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
गुजरातच्या किनारपट्टीवरील एका खाजगी कंपनीत काम करणारा मजूर दररोज २०० रुपयांसाठी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. गुजरातमधील द्वारका येथे काम करणारा दीपेश गोहिल फेसबुकवर असिमा या कथित पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. गोहिलने द्वारकेतील ओखा भागातून संवेदनशील फोटो गोळा केले आणि ते पाकिस्तानला पाठवले, अशी माहिती एटीएसने दिली.
गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “ओखा येथील एक व्यक्ती व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तानी नौदल किंवा आयएसआयच्या एजंट्ससोबत तटरक्षक नौकेची माहिती शेअर करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तपासानंतर आम्ही ओखा येथील रहिवासी दिपेश गोहिल याला अटक केली. दीपेश ज्याच्या संपर्कात होता तो पाकिस्तानचा होता.
एटीएसच्या म्हणण्यानुसार, दीपेशला ओखा बंदरात उभ्या असलेल्या जहाजांमध्ये सहज प्रवेश मिळाला होता. पाकिस्तानी गुप्तहेरांना माहिती देण्यासाठी त्याला दररोज 200 रुपये मिळतात आणि त्याचे कोणतेही खाते नसल्याने त्याने हे पैसे त्याच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर मित्राकडून रोख रक्कम घेतली आणि वेल्डिंगच्या कामासाठी पैसे असल्याचे सांगितले. आतापर्यंत दीपेशने संवेदनशील माहिती पुरवून सुमारे ४२ हजार रुपये कमावले होते. तटरक्षक दलाच्या बोटी तैनात असलेल्या भागापर्यंत दिपेश गोहिलची ओळख होती अशीही माहिती एटीएसने दिली. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा:
Border–Gavaskar Trophy 2024/25 : ॲक्शन व कौशल्यांमुळेच बुमराह भेदक गोलंदाज – स्टीव्हन स्मिथ





