आरोग्यदायी शेवग्याला‘महागाईची फोडणी‘

नगर – भाजीपाला महाग झाल्याने सरसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. भाजीपाल्याची मार्केटला होणारी आवक घटली आहे ,त्यामुळे शेवगा,गवार निम्म्याहून भाजीपाला शंभरी पार गेला आहे. उन्हाळ्यामुळे लावलेले रोप जळून गेले तर जून सुरवातीला झालेल्या पावसामुळे अर्ध्याहून जास्त भाजीपाला सडून गेला. मागणी जास्त पुरवठा कमी असे झाले आहे. भाज्यांचे दर वाढले आहेत.
वातावरणातील सततच्या बदलामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. घेवडा ८० ते १५०, गवार १००ते १२०, शेवगा १००ते १३०, कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकल्या जात आहेत. बाजारात फुल कोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहे. काही दिवसांनंतर भाजीपाला आणखी महाग होणार आहे.
यंदा उन्हाचा कडाका जास्त असल्याने रोप जळून गेली तर काही ठिकाणी पावसामुळे पीक जळाली आवक कमी झाल्याने बटाटे, कांदे आणि टोमॅटो वगळता सर्वच भाज्यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे आता महिलांचे बजेट कोलमडले आहे.
पाऊस नसल्याने भाजी पाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत, पावसाळ्यात शेवगा येत नसल्याने भाव वाढले आहेत. पाऊस जोरदार झाला तर भाज्यांचे दर आणखी वाढतील,आता ग्राहक अर्धा किलो भाज्या घेणारे पावशेरवरच भागवतात. यामुळे आपण २० ते ३० टक्के कमी माल भरत आहोत.
दत्तात्रय गायकवाड , व्यापारी
भाज्यांचे दर
अहमदनगर ,महात्मा फुले मंडईत मिळालेले घाऊक दर
कोथंबीर १५ ते ३० जुडी, मेथी २० ते २५जुडी, पालक १० ते १५ जुडी
गावरान १५० ते २५० लसूण – १०० ते २०० रुपये प्रति किलो , टोमॅटो – ३५ ते ५० रुपये प्रति किलो, घेवडा – ८० ते १५० रुपये प्रति किलो, कारले – ५० ते ६०रुपये प्रति किलो, गवार – १०० ते १२०रुपये प्रति किलो, वांगी – २५ ते ५०रुपये प्रति किलो, भेंडी – ३० ते ४० रुपये प्रति किलो, शिमला – ५०ते ६०रुपये प्रति किलो, काकडी २०ते २२रुपये प्रति किलो, लिंबू – ३० रुपये प्रति किलो, दुधी भोपळा १५ ते २०रुपये प्रति किलो, हिरवी मिरची ७० ते ८० रुपये प्रति किलो, वाल ५५ ते ८०रुपये प्रति किलो, बटाटा २० ते ३०रुपये प्रति किलो, शेवगा १०० ते १३० रुपये प्रति किलो.





