तैवानच्या हद्दीत चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
Updated On:

तैपेई – तैवान देशाच्या हवाई हद्दीत आज लागापोठ दुसऱ्या दिवशी चिनी लढाऊ विमानांनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, चीनच्या 39 विमानांनी आमच्या हवाईहद्दीत काल दिवसा आणि काल रात्री घुसखोरी केली.
आजही पुन्हा असाच प्रकार घडला आजही 38 विमानांनी आमच्या हद्दीत घुसखोरी करून हवाई दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चीन आणि तैवान यांच्यात 1949 साली फारकत झाली. त्यावेळी कम्युनिस्टांनी मुख्य चिनी भूमीचा ताबा घेतला. आणि त्यांचे विरोधक असलेल्या राष्ट्रवादी शक्तींनी तैवानमध्ये सरकार स्थापन केले आहे.
तेव्हापासून चीनचा तैवान वर डोळा असून हा आपल्याच देशाचा प्रांत आहे, असे चीनचे म्हणणे आहे. त्यासाठी ते सतत तैवानला दबावाखाली ठेवत आहेत.





