“ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने नष्ट” ; IAF प्रमुखांनी केला पाकचा पर्दाफाश

FIGHTER JETS । भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी मोठा खुला केला आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली. याशिवाय आणखी एक मोठे विमानही नष्ट करण्यात आले असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यांनी याचे श्रेय एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० ला दिले आहे.
‘बिग बर्ड’ देखील पाडण्यात आले
पाकिस्तानच्या देखरेख आणि कमांड क्षमतेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या मोठ्या विमानाचे वर्णन “बिग बर्ड” म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) असे करण्यात आले आहे. एअर चीफ मार्शल यांनी या हवाई हल्ल्यांचे श्रेय रशियन बनावटीच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीला दिले, ज्याने पाकिस्तानच्या विमानांना लक्ष्य केले.
दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ला FIGHTER JETS ।
बेंगळुरूमध्ये एअर मार्शल कात्रे वार्षिक व्याख्यानात बोलताना एअर चीफ मार्शल एपी सिंह म्हणाले की, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरच्या उपग्रह प्रतिमांवरून स्पष्टपणे दिसून येते की आजूबाजूच्या इमारतींना कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. ते म्हणाले की, आम्हाला केवळ उपग्रह प्रतिमाच मिळाल्या नाहीत तर स्थानिक माध्यमांद्वारे दहशतवादी अड्ड्यांमधील छायाचित्रेही मिळाली आहेत.
९ दहशतवादी अड्डे नष्ट, १०० हून अधिक दहशतवादी ठार
भारताने ७ मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” या सांकेतिक नावाखाली नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. काही आठवड्यांपूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांचे प्राण गेले.





