पाकिस्तानसोबतच्या तणावात भारताचे शक्तिप्रदर्शन ; गंगा एक्सप्रेसवेवर राफेल, जग्वार, मिराजची उड्डाणे

IAF Fighter Jet । उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये गंगा एक्सप्रेसवेचा ३.५ किमी लांबीची धावपट्टी आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या गर्जनेने दुमदुमून गेली. एक्सप्रेसवेच्या आकाशात राफेल, मिराज-२००० आणि जग्वार सारखी लढाऊ विमाने उडताना दिसली. या हवाई पट्टीवर हवाई दल संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत रात्रीच्या लँडिंगचा ऐतिहासिक सरावदेखील करणार आहे. हा सराव देशातील अशा प्रकारचा पहिलाच रात्रीचा लष्करी हवाई कार्यक्रम आहे, जो एक्सप्रेस वेवर आयोजित केला जाणार आहे. अशाप्रकारे, गंगा एक्सप्रेसवे आता केवळ रस्त्यांचाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचाही कणा बनला आहे.
भारतीय हवाई दलाच्या सरावात तीन प्रमुख लढाऊ विमाने सहभागी आहेत. त्यात राफेल, मिराज-२००० आणि जग्वार यांचा समावेश आहे. ही विमाने गंगा एक्सप्रेस वेवर दिवसा टच अँड गो लँडिंगसह नाईट व्हिजन गाईडेड लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित आहेत.
#WATCH | Shahjahanpur: The Indian Air Force (IAF) is carrying out a flypast on the Ganga Expressway in Uttar Pradesh. The Air Force is conducting take-off and landing exercises here.
The exercise is being organised to assess the expressway’s potential as an alternative runway… pic.twitter.com/dpzacppDfO
— ANI (@ANI) May 2, 2025
भारतीय हवाई दलाने घेतली हवाई पट्टी ताब्यात IAF Fighter Jet ।
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , येथे लढाऊ विमाने देखील सराव करू शकतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, एअर शोच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवाई दलाने ही हवाई पट्टी आपल्या अधिकारक्षेत्रात घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा एअर शो दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी आयोजित केला जाईल, जेणेकरून रात्रीच्या वेळी धावपट्टीवर विमान उतरवण्याची क्षमता देखील तपासता येईल.
बरेली हवाई दल तळावरून आली लढाऊ विमाने IAF Fighter Jet ।
या शो दरम्यान, चाचणी म्हणून लढाऊ विमाने धावपट्टीवर एक मीटर उंचीवर उड्डाण करतील आणि त्यानंतर ही विमाने धावपट्टीवर उतरतील आणि नंतर उड्डाण करतील. त्यांच्या मते, येथे पुन्हा सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सराव आयोजित केला जाईल आणि सर्व लढाऊ विमाने बरेली येथील हवाई दलाच्या तळावरून येतील. यादरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना, सहकार राज्यमंत्री जे.पी.एस. राठोड, लोकप्रतिनिधी आणि हवाई दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत.





