IND vs SA 1st ODI : स्मृती मंधानाचं शानदार शतक, टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर 266 धावांचे लक्ष्य…

Women Cricket (IND vs SA 1st ODI) : भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. आज(रविवार,16 जून) या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकात 8 विकेट गमावत 265 धावा केल्या असून आफ्रिकेसमोर विजयासाठी 266 धावाचं आव्हान ठेवलं आहे.
Innings Break!
A solid batting performance from #TeamIndia to post 265/8 on the board! 👌 👌
1⃣1⃣7⃣ for @mandhana_smriti
3⃣7⃣ for @Deepti_Sharma06
3⃣1⃣* for @Vastrakarp25Over to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/EbYe44lnkQ #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QHmsuyYtEa
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2024
भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा केल्या. स्मृती मंधानाने 127 चेंडूत 117 धावा केल्या. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार मारला. स्मृती मंधानाशिवाय दीप्ती शर्माने 48 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले तर पूजा वस्त्राकरने 42 चेंडूत 31 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली. मात्र याशिवाय भारतीय संघाचे बहुतांश फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. शेफाली वर्मा(07), दयालन हेमलथा(12), हरमनप्रीत कौर(10), जेमिमाह रॉड्रिग्स (17) आणि रिचा घोष(03) या फलंदाजांनी निराशा केली.
T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरूध्द स्कॉटलंड पराभूत, कांगारूंच्या विजयाचा इंग्लडंला झाला फायदा…
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर अयाबोंगा खाखा ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. अयाबोंगा खाखाने 10 षटकांत 47 धावांत 3 बळी घेतले. सबता कलस हिने 2 बळी घेतले. याशिवाय ॲनेरी डेर्कसेन आणि नॉन्डुमिसो शेनगे यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.





