IND vs SA 1st ODI : मंधानाच्या शतकानंतर गोलंदाजांचा कहर, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय…

Women Cricket (IND vs SA 1st ODI) : भारतीय महिला क्रिकेट संघाने 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 143 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेसमोर भारतानं 266 धावांचे लक्ष्य ठेवलं होते, परंतु आफ्रिकेचा संघ 37.4 षटकात केवळ 122 धावांवरच गारद झाले. या विजयानंतर भारतीय संघाने तीन वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 19 जून रोजी होणार आहे.
भारताच्या 265 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. 4 चेंडूत 4 धावा काढून लॉरा वूलमार्ट रेणुका सिंगची शिकार ठरली. ताजमिन ब्रिट्सने 31 चेंडूत 18 धावा केल्या. अनिके बॉश 13 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. तर सून लुस 58 चेंडूत 33 धावा करून दीप्ती शर्माची शिकार झाली. मेरिजन केपने 39 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 143 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आशा शोभना ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. आशा शोभनाने 8.4 षटकात 21 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्माला 2 यश मिळाले. तसेच रेणुका सिंग ठाकूर, पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
Vice-captain Smriti Mandhana scored a superb ton to set up #TeamIndia‘s win & bagged the Player of the Match award in the 1⃣st #INDvSA ODI 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/EbYe44lVao@mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7p5lL7MQMy
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2024
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकात 8 विकेट गमावत 265 धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा केल्या. स्मृती मंधानाने 127 चेंडूत 117 धावा केल्या. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार मारला.
स्मृती मंधानाशिवाय दीप्ती शर्माने 48 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले तर पूजा वस्त्राकरने 42 चेंडूत 31 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली. मात्र याशिवाय भारतीय संघाचे बहुतांश फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. शेफाली वर्मा(07), दयालन हेमलथा(12), हरमनप्रीत कौर(10), जेमिमाह रॉड्रिग्स (17) आणि रिचा घोष(03) या फलंदाजांनी निराशा केली.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर अयाबोंगा खाखा ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. अयाबोंगा खाखाने 10 षटकांत 47 धावांत 3 बळी घेतले. सबता कलस हिने 2 बळी घेतले. याशिवाय ॲनेरी डेर्कसेन आणि नॉन्डुमिसो शेनगे यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.





