#INDvAUS : निर्णायक वन-डे साठी ‘असा’ आहे भारतीय संघ

बेंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज वन-डे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना होणार आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघाचा मालिका जिंकण्याचा निर्धार असणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आहे. कर्णधार अॅरन फिंचने प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिला सामन्यात एकतर्फी विजय मिळविला. परंतु दुसरा सामना जिंकत भारताने १-१ अशी बरोबरी साधत मालिकेतील आव्हान कायम राखले. भारताने राजकोटमध्ये प्रत्येक क्षेत्रात शानदार कामगिरी करून पराभवाची परतफेड केली. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दुस-या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. यष्टीरक्षक म्हणून लोकेश राहुल जबाबदारी पार पडणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, मनीष पांडे, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह
3rd ODI. India XI: R Sharma, S Dhawan, V Kohli, S Iyer, KL Rahul, M Pandey, R Jadeja, M Shami, K Yadav, N Saini, J Bumrah https://t.co/VThwmex3Kb #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) January 19, 2020
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दुस-या सामनात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आजच्या संघात एक बदल केला आहे. गोलंदाज रिचर्डसन एवजी संघात जोश हेझलवूडला संघात संधी दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, ऐरन फ़िंच, स्टीव स्मिथ, मार्नस लबुशेन, एलेक्स कैरी, अश्टन टर्नर, एश्टन एगर, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेज़लवुड, एडम ज़म्पा
3rd ODI. Australia XI: A Finch, D Warner, S Smith, M Labuschagne, A Carey, A Turner, A Agar, P Cummins, M Starc, A Zampa, J Hazlewood https://t.co/VThwmex3Kb #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) January 19, 2020
दरम्यान, भारत-आस्ट्रेलिया या संघांत भारतात होत असलेली ही दहावी वन-डे मालिका आहे. यामध्ये पाच वेळा ऑस्ट्रेलियाने तर चार वेळा भारताने मालिका जिंकल्या आहे. आज मालिका कोण जिंकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे.





