\n

भारताने विजयासाठी दिलेल्या २८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार एलिसी हिलीला खातेही उघडता आले नाही. मात्र, त्यानंतर लिचफिल्ड व पेरी यांनी १४८ धावांची भागीदारी केली. आक्रमक फलंदाजी करत असलेली पेरी ७५ धावांवर बाद झाली व ही जोडी फुटली. तीने या खेळीत ७२ चेंडूत ९ चौकार व २ षटकार फटकावले. त्यानंतर काही धावांची भर घालत लिचफिल्डही ७८ धावांवर बाद झाली. तीने ८९ चेंडूत ८ चौकार व १ षटकार फटकावला. या वेळी बेथ मुनी व ताहिला मॅकग्रा यांनी संघाच्या अडीचशे धावा फलकावर लावल्या.

\n

मुनीही अर्धशतक फटकावणार असे वाटत असतानाच ४७ चेंडूत ४ चौकारांसह ४२ धावा करुन बाज झाली. दरम्यान मॅकग्राने आपले अर्धशतक पूर्ण केले. तीने अश्‍ले गार्डनरच्या साथीत कोणताही धोका न पत्करता संघाचा विजय साकार केला. गार्डनरने नाबाद ७ धावा करत तीला सुरेख साथ दिली. मॅकग्रा ५५ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांसह ६८ धावा करुन नाबाद राहीली. एकमेव कसोटीत भारताकडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र, विजयी सलामी दिली. भारताकडून रेणुका सिंग, पुजा वस्त्रकार, स्नेह राणा व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

\n

#INDvAUS 1st ODI : जेमिमा-पूजाची अर्धशतके; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य…

\n

\n

तत्पूर्वी, यस्तीका भाटीयाच्या उपयुक्त खेळीनंतर जेमिमा रॉड्रीक्स व पुजा वस्त्रकार यांनी फटकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताच्या महिला संघाने गुरुवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासमोर विजयासाठी २८३ धाव करण्याचे आव्हान ठेवले.

\n

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी फलंदाज स्मृती मानधना या सामन्त खेळणार नसल्याने यस्तीका भाटीयाने शेफाली वर्मासह डावाची सुरुवात केली. शेफालीने साफ निराशा केली. त्यानंतर रिचा घोषने यस्तीकाला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिचा २१ धावांवर परतली. तसेच कर्णधार हरमनप्रीतनेही निराशा केली. यावेळी स्थिरावलेली यस्तीकाही ४९ धावांवर बाद झाली. तीचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. या खेळीत तीने ६४ चेंडूत ७ चौकार फटकावले. त्यानंतर मात्र जेमिमा रॉड्रीक्सने एकहाती खेळ केला. तीने दीप्ती शर्मा (२१) व अमनज्योत कौर (२०) यांच्यासह संघाला अर्धशतकी, शतकी तसेच दीडशतकी मजल मारुन दिली.

\n

दरम्यान या दोघी बाद झाल्यावर जेमिमाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तीने जबाबदारीने फलंदाजी केली व पुजासह संघाचे द्विशतक फलकावर लावले. शतकाकडे कूच करत असेली जेमिमा ८२ धावांवर बाद झाली. तीने ७७ चेंडूत ७ चौकार मारले. तीच्या जागी फलंदाजीला आलेली स्नेह राणा अपयशी ठरल्यावर पुजाने उरलेल्या षटकांत आपल्याच हाती सुत्रे घेत सुरेख फलंदाजी केली. तीने अर्धशतक पूर्ण करताना नाबाद ८२ धावांची खेळी केली व संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. या खेळीत तीने ४६ चेंडूत ७ चौकार व २ षटकार अशी आतषबाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून अश्‍ले गार्डनर व जॉर्जिया वेरहॅम यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#INDvAUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाची भारतीय संघावर 6 गडी राखून मात….","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/aus-5.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-odi-australia-beat-india-by-6-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/aus-5.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-odi-australia-beat-india-by-6-wickets#webpage","name":"#INDvAUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाची भारतीय संघावर 6 गडी राखून मात….","url":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-odi-australia-beat-india-by-6-wickets","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-odi-australia-beat-india-by-6-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/aus-5.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-odi-australia-beat-india-by-6-wickets#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-odi-australia-beat-india-by-6-wickets","name":"#INDvAUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाची भारतीय संघावर 6 गडी राखून मात…."}}]}}}

#INDvAUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाची भारतीय संघावर 6 गडी राखून मात….